पुणे तिथे काय उणे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा…; गरजुंसाठी अनोखा उपक्रम

Last Updated:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.

+
नको

नको ते द्या, हवे ते घेऊन जा… ओंजळ फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

पूजा सत्यवान पाटील प्रतिनिधी पुणे
पुणे: पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.
उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या घरातील नको असलेले पण वापरण्यास योग्य कपडे किंवा वस्तू ओंजळ फाउंडेशनकडे जमा करता येतात. तसेच ज्या नागरिकांना अशा वस्तूंची गरज आहे, त्यांना या केंद्रांमधून दिल्या जातात. या उपक्रमाविषयी पद्मिनी कांबळे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
पद्मिनी कांबळे यांनी सांगितलं की, घरात चांगल्या स्थितीत असलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तू याठिकाणी जमा करू शकता. या वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे हा या फाउंडेशनचा उद्देश आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, भांडी, पुस्तके अशा अनेक वस्तू येथे जमा करता येतात किंवा गरज असल्यास येथून घेऊनही जाता येतात. मात्र, मोडकळीस आलेल्या किंवा वापरता न येणाऱ्या वस्तू येथे स्वीकारल्या जात नाहीत.
advertisement
हा उपक्रम सोमवार ते शनिवार दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत जुन्या सांगवीतील गजानन महाराज मंदिरासमोर चालू असतो. नको ते ठेवा, हवे ते घेऊन जा हा उपक्रम फक्त वस्तूंची देवाणघेवाण नाही. हा उपक्रम समाजातील एकमेकांना मदत करण्याचा, पर्यावरणाची काळजी घेण्याचा आणि मानवतेचा संदेश देतो. पिंपरी-चिंचवड आणि जुनी सांगवी परिसरातील लोकांकडून या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे तिथे काय उणे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा…; गरजुंसाठी अनोखा उपक्रम
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement