टीईटी घोटाळ्यातील आरोपी सुपेंच्या 2 कोटी 87 लाख रोकड, 145 तोळं सोनं संपत्ती प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेंच्या संपत्तीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड, 6 डिसेंबर, वैभव सोनवणे : टीईटी पेपरफुटी प्रकरणी (tet paper leak case) माजी शिक्षण अधिकारी तुकाराम सुपेंवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 87 लाखांची रोकड आणि 145 तोळं सोनं जप्त करण्यात आलं होतं. आता या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. तुकाराम सुपेंकडून जप्त केलेली संपत्ती भ्रष्टाचारातून कमवलेली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुपेंविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
टीईटी घोटाळ्यात तुकाराम सुपे यांनी अवैधरित्या पैसे कमावल्याचा आरोप होता, या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. या प्रकरणात त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 87 लाखांची रोकड आणि 145 तोळं सोनं जप्त करण्यात आलं होतं.
ही संपत्ती त्यांनी चुकीच्या मार्गानं जमा केली असून, त्यांच्या लोकसेवक काळातील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात आता त्यांच्याविरोधात पिंपरी पोलिसांच्या सांगवी पोलीस स्थानाकात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात पश्चिम महाराष्ट्रातील आणखी दोन शिक्षणाधिकारी एसीबीच्या रडावर असल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2023 1:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
टीईटी घोटाळ्यातील आरोपी सुपेंच्या 2 कोटी 87 लाख रोकड, 145 तोळं सोनं संपत्ती प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर