Pune News : दुभाजक नाही, दिवे नाहीत, मग पूल कशासाठी? कोट्यवधींचा सांगवी-बोपोडी पूल प्रशासनाच्या अक्षम्य चुकांमुळे केवळ 'देखावा' बनला

Last Updated:

Sangavi-Bopodi Bridge : सांगवी-बोपोडी पुलासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र औंध, खडकी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दुभाजक नसल्यामुळे वाहतूक एकेरी झाली आहे.

News18
News18
पुणे  : सांगवी-बोपोडी पुलाचे लोकार्पण पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून झाले. हा 760 मीटर लांबीचा पुल तब्बल 40 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला गेला. पण आजही हा पूल वाहतुकीसाठी अपेक्षित सुविधा देत नाही कारण दुभाजक नसल्याने वाहनांना फक्त सांगवीकडून खडकीकडे जाणे शक्य आहे. पुणे किंवा औंधकडे जाण्यासाठी वाहनांना लांब वळसा घालावा लागतो. परिणामी हा पूल मुख्य मार्गाप्रमाणे काम करत नाही आणि केवळ एकेरी वाहतूक सुरू आहे.
पूल जरी लोकार्पित झाला असला तरी सध्या येथे वाहतूक मर्यादित आहे. औंध रस्त्यावर दुभाजक नसल्याने खडकी-बोपोडी मार्गातून येणारी दुचाकी वाहन उलट दिशेने येतात. त्यामुळे रहदारीच्या वेळेस येथे मोठी कोंडी होते. पुलावर दृश्यता कमी असते. विशेषतहा रात्री आणि पावसाळ्यात ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. नागरिकांनी महापालिका आणि वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या असून तरीही योग्य दिवे, मार्गदर्शक चिन्हे तसेच रस्त्यावरील सुधारणा अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे या भागात वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे.
advertisement
पूलावर सध्या तुरळक वाहतूक असते, त्यामुळे पादचारी मार्गाचा उपयोग लोकांना व्यायामासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी होत आहे. मात्र काही तरुण हुल्लडबाजी करत आहेत. ते बाईकवर स्टंट करतात, वेगाने वाहन चालवतात, शर्यती लावतात आणि रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून फोटो घेतात. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहतूक दोन्ही प्रभावित होत आहेत.
वाहनचालकांच्या अपेक्षा होती की सांगवी-बोपोडी पूल मुळे बेमेन चौक, औंध-रावेत रस्ता, खडकी, बोपोडी आणि स्पायसर शाळा या रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल. पण दुभाजक नसल्यामुळे हा पूल एकेरी मार्गापुरता मर्यादित राहिला आहे. परिणामी वाहनचालकांना अजूनही मोठा वळसा घालावा लागतो, वेळ वाया जातो आणि अपघाताची शक्यता वाढते. नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : दुभाजक नाही, दिवे नाहीत, मग पूल कशासाठी? कोट्यवधींचा सांगवी-बोपोडी पूल प्रशासनाच्या अक्षम्य चुकांमुळे केवळ 'देखावा' बनला
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement