शासन आणि प्रशासनाला मानवी चेहरा देणाऱ्या मुख्यमंत्रांकडून विक्रमी नोकरभरती
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
शासन आणि प्रशासनास मानवी चेहरा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी भरती प्रक्रियेत क्रांतिकारक बदल करून तिला अधिक गतिमान केले आहे.
एका बाजूला शासकीय कार्यालये, त्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामातील उत्कृष्टता आणि अत्युच्च कार्यक्षमतेचा आग्रह धरतानाच शासन आणि प्रशासनास मानवी चेहरा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी भरती प्रक्रियेत क्रांतिकारक बदल करून तिला अधिक गतिमान केले आहे. प्रक्रियेतील या सुधारणांमुळे एका दिवसात सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या तब्बल १०,००० उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊन रेकॉर्डब्रेक महाभरती करणे शक्य झाले आहे. यापैकी ५१८८ नियुक्तीपत्रे शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर देण्यात आली आहेत. अनुकंपा तत्त्वावरील ही नोकरभरती अनेक वर्षे प्रलंबित होती. उर्वरित ५१२२ नियुक्तीपत्रे क वर्ग लिपिक-टंकलेखक पदासाठी आहेत. महाराष्ट्रात प्रथमच एका दिवसात एवढी मोठी नोकरभरती करण्यात आलेली असून या महाभरतीमधून मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती राज्य सरकारचा मानवी दृष्टिकोन, विकासान्मुख आणि कार्यक्षमता पोषक धोरण तसेच राज्याच्या कारभाराचा चेहरामोहरा बदलून शासन आणि प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्याची तळमळ दिसून येते.
महाराष्ट्राच्या शासन आणि प्रशासनाला उच्च कार्यक्षमता आणि मानवी चेहरा या गुणांच्या आधारे कार्यक्षम, लोकाभिमुख आणि विकासान्मुख बनवण्याकडे अभ्यासू, तडफदार आणि कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रयत्न सातत्याने सुरु असतात. त्यांनी सुरु केलेल्या १०० दिवसांची कार्यक्षमता मोहिमेमुळे शासकीय कार्यालयांचा चेहरामोहराच नव्हे तर कार्यपद्धतीत देखील सकारात्मक बदल घडून येत आहेत. कारभाराला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी त्यांनी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरभरती एका दिवसात करण्याचा विक्रम केला आहे.
advertisement
ऐन सणासुदीच्या दिवसात तब्बल १०,३०९ पदे भरण्यासाठी नियुक्तीपत्रे देऊन फडणवीस यांनी राज्यातील हजारो कुटुंबियांना दिवाळीची आगळीवेगळी भेट दिली आहे. या महाभरतीमध्ये अनुकंपा तत्वावर देण्यात येणाऱ्या नोकऱ्या आणि क वर्ग लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची नेमणूक अशा दोन प्रकारच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकांच्या प्रक्रियेतील सुधारणा
शासकीय कर्मचारी शासनाच्या सेवेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा मुलास अथवा मुलीस अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे राज्य शासनाचे जुनेच धोरण आहे. तथापि, तांत्रिक अडचणी आणि अन्य कारणांनी अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका अनेक वर्षे रखडल्या होत्या. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन फडणवीस सरकारने अनुकंपा तत्वावर नेमणूक करण्याच्या प्रक्रियेत परिवर्तनकारी सुधारणा केल्या आहेत. There were 45 GRs which created confusion and resulted in delays. These GRa were merged into one single GR and the authority was delegated to the District Collectors which resulted in faster decision making. त्यामुळे यापुढील काळात अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका वेळेत होऊ शकतील. या सुधारणामुळेच दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या ५,१८७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देणे शक्य झाले आहे.
advertisement
क वर्ग लिपिक-टंकलेखक पदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या
या प्रक्रियेद्वारे, ५,१२२ उमेदवारांना सरकारी पदांवर नियुक्त केले गेले आहे. लिपिक-टंकलेखक संवर्गासाठीच्या जुन्या भरती प्रक्रियेत देखील फडणवीस सरकारने मोठ्या सुधारणा केल्यामुळे आता या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेचा वेग प्रचंड वाढणार आहे. ही इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बाब आहे.
advertisement
प्रथमच, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यभरातील लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी एकत्रित परीक्षा आणि भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या सुधारणेमुळे अनेक समान परीक्षा प्रक्रियांची पुनरावृत्ती टळली आहे आणि त्या एकाच एकत्रित प्रणालीत घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. परीक्षेनंतरच्या चारित्र्य आणि जात पडताळणीसारख्या प्रक्रिया 'मिशन मोड'वर राबवण्यात आल्यामुळे नियुक्ती पत्रे जारी करण्यासाठी एक जलद आणि पारदर्शक प्रणाली सुनिश्चित झाली. सर्व उमेदवारांसाठी या एकवेळच्या कागदपत्र पडताळणी आणि रुजू (onboarding) प्रक्रियेमुळे, विलंब आणि कार्यक्षमतेचा अभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला.
advertisement
भरती प्रक्रियेतील या सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ आणि त्या अनुषंगाने फडणवीस सरकारने बनवलेल्या विकसित महाराष्ट्र २०४७ धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीस अधिक गतिमान करणार आहेत. फडणवीस सरकारच्या विकसित महाराष्ट्र २०४७ धोरणामध्ये प्रामुख्याने पुढील सुधारणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार भासणाऱ्या नव्या आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम असे स्वरूप प्रशासनास देणे. जलद निर्णयांसाठी प्रशासनातील स्तरांची रचना हटवणे आणि आणि प्रशासनाला अधिकार प्रदान करणे.
- कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भरतीपासून ते निवृत्तीपर्यंतची पारदर्शक आणि गतिमान अंमलबजावणीवर भर देणारी प्रक्रिया निर्माण करणे.
- कार्यक्षमतेचे आणि कामातील गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी मापन करण्यासारखे केपीआय (KPIs) निश्चित करणे आणि सुधारित कर्मचारी कार्यक्षमतेद्वारे अधिक प्रभावी कामकाज व्यवस्थापन करणे.
advertisement
सरकारी भरतीचे जिल्हानिहाय तपशील
अनु क्र | जिल्हा | अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या | लिपिक-टंकलेखक पदासाठी नियुक्त्या | एकूण नियुक्त्या |
१ | मुंबई शहर | ७३ | १७०६ | १७७९ |
२ | मुंबई उपनगर | २४ | २८ | ५२ |
३ | ठाणे | २९० | २६५ | ५५५ |
४ | पालघर | २६६ | ५९ | ३२५ |
५ | रायगड | १०२ | ७३ | १७५ |
६ | रत्नागिरी | २० | ७६ | ९६ |
७ | सिंधुदुर्ग | २७ | ६९ | ९६ |
८ | पुणे | ४५४ | ४३१ | ८८५ |
९ | सातारा | १५८ | ३६ | १९४ |
१० | सांगली | ६८ | २० | ८८ |
११ | सोलापूर | १८१ | ४३ | २२४ |
१२ | कोल्हापूर | १५३ | १३० | २८३ |
१३ | नाशिक | १९३ | ३६९ | ५६२ |
१४ | धुळे | १०६ | ३७ | १४३ |
१५ | जळगाव | १२५ | ८३ | २०८ |
१६ | नंदुरबार | ५० | ३१ | ८१ |
१७ | अहिल्यानगर | १६१ | ९५ | २५६ |
१८ | नागपूर | २३७ | ३६४ | ६०१ |
१९ | वर्धा | ५१ | २१ | ७२ |
२० | भंडारा | १७६ | ६ | १८२ |
२१ | गोंदिया | १९६ | ४३ | २३९ |
२२ | चंद्रपूर | २१७ | ८३ | ३०० |
२३ | गडचिरोली | १२९ | ४७ | १७६ |
२४ | अमरावती | १७८ | २०९ | ३८७ |
२५ | अकोला | १०८ | ६३ | १७१ |
२६ | यवतमाळ | १८२ | ५५ | २३७ |
२७ | बुलढाणा | १२३ | ४३ | १६६ |
२८ | वाशीम | ५२ | १४ | ६६ |
२९ | छत्रपती संभाजीनगर | २०० | ३७१ | ५७१ |
३० | जालना | ७९ | १८ | ९७ |
३१ | परभणी | ९० | २३ | ११३ |
३२ | हिंगोली | ५३ | ११ | ६४ |
३३ | नांदेड | ३०८ | ४७ | ३५५ |
३४ | बीड | १२५ | ३२ | १५७ |
३५ | लातूर | १०० | ९९ | १९९ |
३६ | धाराशिव | १३२ | २२ | १५४ |
एकूण | ५१८७ | ५१२२ | १०३०९ |
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:17 AM IST