MHADA Pune: पुण्यात फक्त अर्ज करून मिळणार हक्काचं घर, MHADA ची मोठी घोषणा

Last Updated:

MHADA Pune: पुणेकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे. MHADA ने मोठी घोषणा केलीये.

MHADA Pune: पुण्यात फक्त अर्ज करून मिळणार हक्काचं घर, MHADA ची मोठी घोषणा
MHADA Pune: पुण्यात फक्त अर्ज करून मिळणार हक्काचं घर, MHADA ची मोठी घोषणा
पुणे: पुण्यात घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. MHADA पुणे मंडळाने काही शिल्लक राहिलेल्या घरांचे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना सामान्य प्रवर्गातील गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी आहे. म्हणजेच ज्या लोकांना अद्याप MHADA कडून घर मिळालं नाही आणि जे पात्र आहेत, त्यांना आता सोडतीची वाट न पाहता थेट अर्ज करून घर मिळवता येईल.
शिल्लक घरे कशी मिळणार?
MHADA कडून राबवण्यात आलेल्या 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत काही घरे मागणी कमी असल्यामुळे शिल्लक राहिली आहेत. ही घरे आता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि पात्र असलेल्या अर्जदारांना जे आधी अर्ज करतील त्यांना आधी घर दिलं जाईल अशा पद्धतीने वाटली जाणार आहेत.
advertisement
अर्ज कधी व कसा करायचा?
अर्जाची सुरुवात 10 एप्रिल 2025 पासून होणार असून https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळवर नोंद करावी.
पूर्णपणे ऑनलाइन नोंदणी असणार आहे. अर्ज करताना लागणारी सर्व माहिती व कागदपत्रं नीट भरावीत आणि अपलोड करावीत.
घरे कुठे आहेत?
विकसकांकडून MHADA ला जेवढ्या घरांची माहिती येईल, त्या त्या वेळेस ती घरे ऑनलाईन यादीत दिसतील. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत राहणं महत्त्वाचं आहे.
advertisement
अधिकाऱ्यांचे आवाहन
MHADA पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं की, "ही योजना पारदर्शक आहे आणि गरजू नागरिकांना घर मिळावे यासाठी खास तयार केली आहे. त्यामुळे पात्र लोकांनी जरूर अर्ज करावा."
मराठी बातम्या/पुणे/
MHADA Pune: पुण्यात फक्त अर्ज करून मिळणार हक्काचं घर, MHADA ची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement