Nilesh Gaiwal : निलेश घायवळच्या गँगवर पुणे पोलिसांची आणखी मोठी कारवाई, 2 जणांना केली अटक
- Published by:Sachin S
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
सध्या निलेश घायवळ परदेशात आहे, त्यामुळे या दोघांचे त्याच्याशी काही कनेक्शन आहे का याचा तपास पुणे पोलीस करत आहेत
पुणे : पुण्यातला कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ सध्या लंडनला पळून गेला आहे. पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर कारवाईचा धडाका लावला आहे. अशातच पुण्यात घायवळ टोळीतील २ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. आता अटकेत आलेल्या या दोन्ही गुन्हेगारांचा घायवळशी काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलीस करत आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे इथून घायवळ गँगमधील दोघांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गांजा विक्री करताना या दोघांना अटक केली. मुसाब इलाही शेख ( वय 55, राहणार कोथरूड, पुणे) तर दुसरा आरोपी तेजस पूनमचंद डांगी (वय 33, नऱ्हे) असं अटकेत असलेल्या गुन्हेगारांची नावं आहे. या दोन्ही आरोपींवर अगोदरच वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत.
advertisement
मुसाफ इलाई शेख हा बेकायदेशीररित्या गांजा स्वतः जवळ बाळगून तो विकत होता. त्याच्या ताब्यातून 878 ग्राम गांजा ज्याची किंमत बारा हजार दोनशे साठ रुपये एवढी आहे. यातील मुसाफ इलाई शेख याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल तर तेजस डांगी याच्यावर दोन गुन्हे हिंजवडी पोलीस स्टेशनला दाखल आहेत.
सध्या निलेश घायवळ परदेशात आहे, त्यामुळे या दोघांचे त्याच्याशी काही कनेक्शन आहे का याचा तपास पुणे पोलीस करत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
advertisement
या दोन्ही आरोपींनी नऱ्हे इथून अटक केली आहे. आज मोक्का अंतर्गत गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतलं आहे. 10 ऑक्टोबर आमच्याकडे गुन्हा आला आहे, विविध टीम बनवून आरोपी शोध घेतला जात आहे अजून ही अटक केल्या जातील. निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. सचिन घायवळ यालाही अटक करण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यात येतोय. अंधेकर टोळीवर प्लॉट बळकावणे बाबत उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होईल, असंही पंकज देशमुख यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Pune Cantonment (Pune Camp),Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:41 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Nilesh Gaiwal : निलेश घायवळच्या गँगवर पुणे पोलिसांची आणखी मोठी कारवाई, 2 जणांना केली अटक