आळंदी आणि देहूतील वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! स्वच्छ होणार इंद्रायणी, 443 कोटींचा प्रकल्प मार्गी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असून, वर्षभर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी असते
पिंपरी-चिंचवड : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अखेर गती मिळाली आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या प्रकल्पांतर्गत विविध कामांसाठी तब्बल 443 कोटी 51 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या 'अमृत २.० अभियान' अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात तळवडे ते चन्होलीपर्यंत सुमारे २०.६ किलोमीटर लांबीची इंद्रायणी नदी आहे. या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असून, वर्षभर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, विविध शहरे, गावे आणि औद्योगिक परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे प्रशासनाने नदीत स्नान करण्यास मनाई केली आहे.
advertisement
नदीतील वाढते प्रदूषण आणि पूर नियंत्रण हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या निविदेमध्ये प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण, दोन ठिकाणी ६० एमएलडी क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रांची (STP) उभारणी आणि नदीकाठचे सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे. या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता झाली असून, कंत्राटदारांना १८ डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 28, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आळंदी आणि देहूतील वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! स्वच्छ होणार इंद्रायणी, 443 कोटींचा प्रकल्प मार्गी


