चिंताजनक! पिंपरी-चिंचवडची हवा 'विषारी'; शहराचा AQI 200 पार, नागरिकांसाठी धोक्याची घंटा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
AQI २०० अंकांची मर्यादा ओलांडणारी हवा 'अतिशय खराब' श्रेणीत मोडते. सध्या पिंपरी-चिंचवडमधील हवा याच श्रेणीत आहे.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सातत्याने धोकादायक पातळी ओलांडत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अनेक दिवस 'खराब' श्रेणीत राहिला.यामुळे पिंपरी-चिंचवडची गणना महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (IITM) यांच्यामार्फत शहरात एकूण २८ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते. अलीकडील नोंदीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राने सर्वाधिक प्रदूषणाची पातळी नोंदवली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१४ दिवसांपैकी) तब्बल सात दिवस शहराचा AQI २०० अंकांची मर्यादा ओलांडून 'अतिशय खराब' श्रेणीत पोहोचला होता.
advertisement
प्रदूषणाची प्रमुख कारणे आणि धोका:
हवेच्या गुणवत्तेतील या गंभीर घसरणीसाठी मुख्यत्वे पीएम 2.5 (PM 2.5) आणि पीएम 10 (PM 10) हे सूक्ष्म कण जबाबदार आहेत.
बांधकाम आणि धूळ: शहरातील अनियंत्रित बांधकाम प्रकल्प, रेडी-मिक्स काँक्रिट (RMC) प्लांट्समधून होणारे उत्सर्जन आणि रस्त्यांवरील धूळ हवेत मोठ्या प्रमाणावर मिसळून PM 10 कणांचे प्रमाण वाढवत आहेत.
advertisement
वाहन आणि उद्योग: वाहनांच्या धुरामुळे PM 2.5 चे प्रमाण वाढते, तर औद्योगिक कामकाज आणि उत्सर्जनामुळे एकूण प्रदूषणभार वाढत आहे.
AQI २०० अंकांची मर्यादा ओलांडणारी हवा 'अतिशय खराब' श्रेणीत मोडते. सध्या पिंपरी-चिंचवडमधील हवा याच श्रेणीत आहे. यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि श्वासोच्छ्वास तसेच हृदयविकाराच्या व्यक्तींना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
advertisement
प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांसाठी सूचना:
शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मिस्ट फाउंटन्स, एअर बिन्स आणि यांत्रिक रस्ता-स्वच्छता यंत्रणा अशा उपाययोजना सुरू असल्याचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच, प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आरएमसी प्लांट्स आणि बांधकामस्थळांवर सातत्याने कारवाई केली जात आहे.
advertisement
नागरिकांनी काय काळजी घ्यावी:
लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर जाणे टाळावे.
अत्यावश्यक असल्यास घराबाहेर N95 मास्कचा वापर करावा.
घराबाहेर शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
चिंताजनक! पिंपरी-चिंचवडची हवा 'विषारी'; शहराचा AQI 200 पार, नागरिकांसाठी धोक्याची घंटा











