थरथरता हात, डोळे अश्रूंनी डबडबले; वडिल धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर आला सनी देओल, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉर्डर 2 चा टीझर लाँचवेळी अभिनेता सनी देओल इमोशनल झाला. वडिल धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी पहिल्यांदा कॅमेरासमोर आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'बॉर्डर 2' या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. सिनेमाच्या टीझर लाँचवेळी अभिनेता सनी देओलनं देखील उपस्थिती लावली होती. वडिल धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तो पहिल्यांदा कॅमेरासमोर आला. टीझर लाँचवेळी बोलताना सनी देओलला अश्रू अनावर झाले. तो प्रचंड इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. सिनेमातील एक डायलॉग बोलताना सनी इमोशनल झाला होता. तरीही त्याने त्याच जोशात डायलॉग बोलून दाखवला.
"आवाज कहा तक जानी चाहिए? लाहोर तक..." हा डायलॉग बोलताना सनी देओलचे डोळे अश्रूंनी भरले. त्याच्या भावना दाटून आल्या होत्या. डायलॉग बोलून तो खूप शांत झाला. त्यानंतर सनी देओलने कार्यक्रमात देशभक्ती आणि तरुण पिढीबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला, "देश आपल्या आईसारखा आहे आणि आजचा तरुण मागील पिढ्यांप्रमाणेच त्याचे प्रेम करतो आणि त्याचे रक्षण करू इच्छितो. आजच्या तरुण पिढीमध्ये देशाची परंपरा पुढे नेण्याची आणि ती जपण्याची क्षमता आहे. जनरल-झेड म्हणा किंवा इतर काही, ही पिढी आपल्या देशाप्रती जबाबदार आणि संवेदनशील देखील आहे."
advertisement
( Sunny Deol : घराबाहेर आला, हात जोडले अन् XXX, शिव्या देत कुणावर भडकला सनी देओल! VIDEO होतोय व्हायरल )
बॉर्डर 2 च्या टीझर लाँचिंगला सनी देओल वरुण धवन, अहान शेट्टी आणि इतर प्रमुख कलाकारांसह उपस्थित होता. अभिनेता अहान शेट्टी म्हणाला, "चित्रपटादरम्यान मी खूप काही शिकलो. सनी देओल, वरुण धवन, निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला खूप मदत केली. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो."
advertisement
बॉर्डर 2 हा सिनेमा 1997 मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात सनी देओलने मुख्य भूमिका साकारली होती आणि यावेळीही तो मुख्य भूमिकेत परतला आहे. या चित्रपटात मोना सिंग, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मेधा राणा आणि अन्या सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
#SunnyDeol Gets Emotional At #Border2teaser Launch Event 🔥😭 pic.twitter.com/fn7dqfWc8J
— Filmy_Duniya (@FMovie82325) December 16, 2025
advertisement
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ब्लॉकबस्टर केसरीचे दिग्दर्शन केले आहे. बॉर्डर 2 हा चित्रपट पुढील वर्षी 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
थरथरता हात, डोळे अश्रूंनी डबडबले; वडिल धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर आला सनी देओल, VIDEO











