PMC Election: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला,शरद पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुणे महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष न्यायालयात दाद मागणार आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना शुक्रवारी(ता.22) जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार 41 प्रभाग निर्माण करण्यात आले आहे. मात्र सदर रचना निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत केवळ सत्तादारी पक्षाच्या उमेदवारांना सोईची ठरणारी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. त्यामुळे हा प्रभाग रचनेचा वाद आगामी काळात पेटण्याची शक्यता आहे .
advertisement
पुणे महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष न्यायालयात दाद मागणार आहे. प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक आयोग आणि न्यायालयात तक्रार करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने प्रभाग रचना चुकीची , वार्ड तोडत नैसर्गिक सीमारेषा ओलांडत प्रभाग रचना केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे.
advertisement
प्रभाग रचनेविरोधात पुण्यात मोहीम राबवण्यात येणार
पुणे महानगपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये नैसर्गिक नदी, नाले, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यांचा हद्द निश्चित करताना विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे ज्या भागात चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे त्या भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे तक्रार करावी , असे पक्षातर्फे आवाहान करण्यात आले आहे. तसेच चुकीच्या प्रभाग रचनेविरोधात पुण्यात मोहीम राबवण्यात येणार आहे.
advertisement
कशी आहे नवी प्रभाग रचना?
महापालिका निवडणुकीत एकूण 41 प्रभाग असणार आहे. त्यातले 37 प्रभाग चार सदस्यीय तर 4 प्रभाग पाच सदस्यीय असणार आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 36,82, 555 आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 4,65,333 आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1,06,640 इतकी आहे. या लोकसंख्येच्या आधारावर एकूण नगरसेवकांची संख्या 165 निश्चित करण्यात आली आहे. तर आजपासून नागरिकांच्या हरकती देखील मागवल्या जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 23, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMC Election: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला,शरद पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार