वर्दीतला माफिया! पोलीसच निघाला ड्रग्ज डीलर, हवालदाराच्या काळा कारनाम्याचं बिंग कसं फुटलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुणे ग्रामीण पोलिसांनी पहाटे चार वाजता त्याला अटक करत संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हादरवून सोडलं आहे.
पुणे : 'रक्षकच भक्षक बनला' या म्हणीचा प्रत्यय देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा शामसुंदर विश्वनाथ गुजर (बक्कल नं. 2205) हा खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया असल्याचं उघड झालं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पहाटे चार वाजता त्याला अटक करत संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हादरवून सोडलं आहे. या प्रकरणाची पोलिस अधिक्षक संदिपसिंग गिल यांनी पत्रकार परिषद करत माहिती दिली आहे.
अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर हा स्वतः विकत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलातील आणखी कोणी पोलीस अधिकारी सहभागी आहेत का याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे
या प्रकरणाची सुरुवात झाली 17 जानेवारीला जेव्हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शादाब शेख या गॅरेज चालकाला पुणे पोलिसांनी अटक केली. शादाब शेख हा त्याच्या दुचाकीवरून अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांना समजलं होतं पोलिसांनी त्याला एक किलो अंमली पदार्थसह रंगेहाथ पकडलं. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने अंमली पदार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून आणल्याचे सांगितलं.
advertisement
पुणे पोलिसांनी केली आरोपींना अटक
पुणे पोलिसांनी या आरोपींना अटक केली असता त्यांच्याकडे उर्वरित 9 किलो सहाशे 655 वजनाची अंमली पदार्थ मिळून आले? एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून आणले याचा शोध पोलिस करत आहे. तपास सुरू केला असता हे अंमली पदार्थ नगर पोलीस दलातील शामसुंदर गुजर याने त्यांना दिल्याचं समोर आलं.
advertisement
जप्त केलेल्या ड्रग्जची करायचा चोरी
शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे.आत्तापर्यंत या प्रकरणात 10 किलो 707 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. श्यामसुंदर गुजर हा हवालदार मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ काढून त्याची विक्री करत असल्याचं या तपासात समोर आलंय यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी असलेल्या पोलिसांनो जप्त केलेल्या मुद्देमाल मधून विकत होता. सील ओपन करून तो विकत होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
वर्दीतला माफिया! पोलीसच निघाला ड्रग्ज डीलर, हवालदाराच्या काळा कारनाम्याचं बिंग कसं फुटलं?







