Pune News : Porsche कार आजोबांनी दिली होती गिफ्ट; अल्पवयीन नातवाने Whatsappला शेअर केलेला Photo

Last Updated:

अल्पवयीन मुलाने ज्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं ती कार आजोबांनीच त्याला भेट दिली होती अशी माहिती आता समोर येत आहे.

News18
News18
पुणे  : पोर्शे कार अपघात प्रकरणा दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला काही तासात जामीन मिळाला होता. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तर पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलीय. या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांना पोलिसांनी अटक केलीय. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आलीय.
अल्पवयीन मुलाने ज्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं ती कार आजोबांनीच त्याला भेट दिली होती. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून पोर्शे कार नातवाला आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी दिली होती. दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन आरोपीने व्हॉटसअप ग्रुपवर कारचा फोटो पोस्ट करत आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी वाढदिवसाला कार गिफ्ट दिल्याचं म्हटलं होतं.
अल्पवयीन आरोपीचा मित्र अमन वाधवा याने इंडिया टुडेशी बोलताना कारबाबत माहिती दिली. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना कार चालकाला धमकावल्या प्रकरणी अटक करण्यात आलीय. या अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी चालक गंगाराम याच्यावर दबाव टाकला जात होता. गंगारामला दोन दिवस अग्रवाल यांनी कोंडून ठेवले होते.
advertisement
मुलगा, वडील आणि आजोबा अटकेत
पोर्शे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलीय. यामध्ये मुलाचे वडील आणि आजोबांचासुद्धा समावेश आहे. वडिलांनी मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवण्यास दिल्याचा आरोप आहे. तर आजोबांनी अपघातानंतर चालकाला डांबून ठेवल्याचा आणि त्याला गुन्हा स्वत:च्या नावावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
advertisement
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी
पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सी सी टिव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी करण्यात आलीय. अग्रवाल यांचे निवस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसचं अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. ज्या मार्गावरून पोर्शे गाडी फिरवण्यात आली, त्या मार्गावरील सर्व सी सी टिव्ही फुटेज ची पडताळणी केली जात आहे. गुन्हे शाखेच्या हाती यातून अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : Porsche कार आजोबांनी दिली होती गिफ्ट; अल्पवयीन नातवाने Whatsappला शेअर केलेला Photo
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement