Pune: पुण्यातला विचित्र अपघात, टेम्पो उड्डाणपुलावर पलटी, खाली दुचाकीस्वार गंभीर जखमी, VIDEO

Last Updated:

पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील छावा चौकात ही घटना घडली. रितेश घोगरे असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे. 

News18
News18
पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उड्डाणपुलावरून जाताना टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि पलटी झाले. यावेळी टेम्पोतील लोखंडी जॉब उड्डाणपुलावरून खाली पडले. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील छावा चौकात ही घटना घडली. रितेश घोगरे असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे.  उड्डाणपुलावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो पलटला आणि या टेम्पोमधील लोखंडी जॉब हे उड्डाण पुलावरून खाली कोसळले.  या अपघातात टेम्पोतील लोखंडी जॉब उड्डाणपुलावरून खाली फेकले गेले.
advertisement
नेमकं त्यावेळी रितेश घोगरे हे आपल्या दुचाकीवरून जात होता. उड्डाणपुलावर टेम्पो पलटी झाल्यामुळे हवेत उडालेले लोखंडी जॉब खाली फेकले गेले, याचा मोठा आवाज झाला. दुचाकीवरून जाताना रितेश यांनी तो पाहिला आणि वाचण्यासाठी दुचाकी जोरात पळवण्याचा प्रयत्न केला, पण लोखंडी तुकडे हे रितेश यांच्या डोक्यात पडले.  लोखंडी जॉब अंगावर पडल्यामुळे  रितेश घोगरे हे जागेवरच कोसळले. घोगरे यांच्या डोक्यावर लोखंडी जॉब पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
डोक्याला दुखापत झाल्यामुळे रितेश गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेऊन रितेश यांना तातडीने तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो चालक अनिल सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्यातला विचित्र अपघात, टेम्पो उड्डाणपुलावर पलटी, खाली दुचाकीस्वार गंभीर जखमी, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement