पुणेकरांनो, गाडीवर ड्रायव्हर ठेवताना जरा जपून! डॉक्टर अपहण अन् 19 लाखांच्या खंडणी प्रकरणात धक्कादायक खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोलापूर-पुणे महामार्गावरून डॉक्टर उरुळी कांचनहून कुंजीरवाडीकडे आपल्या कारने जात होते. यावेळी चार जणांनी त्यांची कार अडवली आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील कुंजीरवाडी येथील एका ५८ वर्षीय डॉक्टरचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्या चालकावर डॉक्टर सर्वाधिक विश्वास ठेवायचे, तोच चालक या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
१० जानेवारी रोजी रात्री सोलापूर-पुणे महामार्गावरून डॉक्टर उरुळी कांचनहून कुंजीरवाडीकडे आपल्या कारने जात होते. यावेळी चार जणांनी त्यांची कार अडवली आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती.
चालकाच्या कॉल डिटेल्सने खुलासा : पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना डॉक्टरांचा चालक राजेंद्र छगन राजगुरू (३२) याच्या हालचालींवर संशय आला. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स तपासले असता, तो आरोपींशी आधीपासूनच संपर्कात असल्याचे उघड झाले. त्यानेच आपल्या साथीदारांना डॉक्टरांच्या प्रवासाची सर्व माहिती दिली होती.
advertisement
पोलिसांनी राजेंद्र राजगुरू याच्यासह त्याचे साथीदार संतोष बनकर (३६), दत्ता आहेर (३४) आणि सराईत गुन्हेगार सुनील मगर (३०) यांना अटक केली आहे. आरोपींकडून कार आणि खंडणीतील १५ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपींना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 7:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, गाडीवर ड्रायव्हर ठेवताना जरा जपून! डॉक्टर अपहण अन् 19 लाखांच्या खंडणी प्रकरणात धक्कादायक खुलासा








