Pune Crime : पुण्यातील महिला पोलीस निरीक्षकांचा विनयभंग, प्रकरणात शरद पवारांची एन्ट्री! नेमका वाद काय?

Last Updated:

Pune female police inspector molested : महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे याला अद्याप अटक करण्यात आली नाही.

News18
News18
Pune Crime News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 23 जून रोजी पुणे दौऱ्यावर असताना, पुण्यातील भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं. अशातच या प्रकरणी पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अटक करण्यात पोलिसांनी वेळ लावल्याने प्रकरण आणखी पेटल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता या प्रकरणात शरद पवार यांची एन्ट्री झाली आहे.

महिला पोलीस निरीक्षकांचा विनयभंग

पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे याने पुणे पोलिस दलातील महिला पोलीस निरीक्षकांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे, मात्र या प्रकरणात प्रमोद कोंढरे याला अटक करण्यात आली नाही. तर महिला पोलिस निरीक्षकाची मात्र वाहतूक शाखेत बदली करण्यात आल्याचं पहायला मिळालंय.

शरद पवार यांची भेट

advertisement
पुणे शहर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केलेल्या बदली निर्णयाविरोधात संबंधित महिला पोलिस निरीक्षक यांनी मॅटमध्ये धाव घेत आपल्यावर अन्याय होतो, अशी भावना आहे. या सर्व प्रकरणाची माहिती महिला पोलिस निरीक्षक यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन दिली आहे.

प्रकरणाला राजकीय वळण?

दरम्यान, या घटनेनंतर प्रमोद कोंढरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, अद्याप अटक केली गेली नसल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागतंय की काय? असा सवाल विचारला जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील महिला पोलीस निरीक्षकांचा विनयभंग, प्रकरणात शरद पवारांची एन्ट्री! नेमका वाद काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement