चाकू, तलवारी, पिस्तूल अन् बंदुका, अवैध शस्त्रांचं मोठं घबाड; पिंपरीत पोलिसांची धडक कारवाई

Last Updated:

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 91 कोयते, 12 तलवारी, 4 पालघन, 6 चाकू, सुरी, आणि गुप्ती जप्त करण्यात आल्या आहेत.

Pune News
Pune News
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पिपंरी चिंचवडमध्ये भागामध्ये फोफावत असल्याचे समोर येत आहे. खून, दरोडे, चोऱ्या याचा सुळसुळाट सुरूय. अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी कधी कोण कोणाच्या जिवावर उठेल याचा नेम नाही. त्यामुळेच अवैध शस्त्रांच्या चोरट्या व्यापारालाही खतपाणी मिळत आहे. आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे मिळाली आहेत. हे पाहून पोलिसही चक्रावून गेले असून, त्यांनी तब्बल 45 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये मोठी यश मिळवले आहे. गेल्या 20 दिवसांत पोलिसांनी 40 गुन्ह्यांची उकल करत तब्बल 50 पिस्तूल आणि 79 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

45 जणांना अटक 

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांनी सक्रिय सहभाग घेतला. केवळ पिस्तूल आणि काडतुसेच नव्हे, तर पोलिसांनी धारदार आणि घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 91 कोयते, 12 तलवारी, 4 पालघन, 6 चाकू, सुरी, आणि गुप्ती अशा एकूण 116 घातक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
advertisement

शस्त्रांसोबत व्हिडीओ टाकणाऱ्यांवर होणार कारवाई 

या कारवाई दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियावर शस्त्रास्त्रांसोबत व्हिडिओ टाकणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्यांवरही कायद्याचा वचक बसवण्याचे काम पोलिसांनी केले आहे. या मोहिमेमुळे शहरात अवैध शस्त्रास्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांवर अंकुश जरब बसण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
advertisement

धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक

पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा सुरू राहतील, असे पोलीस आयुक्तलयाने सांगितले आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
चाकू, तलवारी, पिस्तूल अन् बंदुका, अवैध शस्त्रांचं मोठं घबाड; पिंपरीत पोलिसांची धडक कारवाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement