Navale Bridge: नवले पुलाच्या 'ब्लॅक स्पॉट'वर पुन्हा भीषण अपघात; स्कूल बसने उडवली पंच कार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका भरधाव स्कूल बसने पुढे चाललेल्या 'पंच' कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका जास्त होता की कारच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
पुणे: शहरातील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र मानलं जाणाऱ्या नवले पुलावर आज (८ डिसेंबर) सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. यात एका भरधाव स्कूल बसने पुढे चाललेल्या 'पंच' कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका जास्त होता की कारच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली
अपघाताच्या वेळी स्कूल बसमध्ये सुदैवाने विद्यार्थी नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. कारमधील दोन प्रवासी या अपघातात जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement
'ब्लॅक स्पॉट'आणि तीव्र उतार:
नवले पूल हा पुण्यातील 19 'ब्लॅक स्पॉट्स' पैकी सर्वात धोकादायक रस्ता मानला जातो. नवीन कात्रज बोगद्याकडून पुलाच्या दिशेने येणारा ४.३ टक्के तीव्र उतार हेच अनेक अपघातांचे मूळ कारण ठरत आहे. या उतारामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित होतो आणि ब्रेक निकामी झाल्याने साखळी अपघात घडतात.
गेल्या १३ नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात ८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतरही काही दिवसांच्या अंतराने साखळी अपघातांच्या घटना घडतच आहेत. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे प्रशासनाने आता केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या न करता, रस्त्याच्या रचनेत बदल करण्यासारख्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र भावना पुणेकर प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Navale Bridge: नवले पुलाच्या 'ब्लॅक स्पॉट'वर पुन्हा भीषण अपघात; स्कूल बसने उडवली पंच कार


