'चल आपण गोराईला फिरायला जाऊ', त्यानंतर तरुणासोबत जे घडलं ते भयंकर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भाईंदरच्या उत्तन सागरी पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय महिलेला संजय दालमेतने फोनवरून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चल आपण गोराईला फिरायला जाऊ येते का? असं सहज विचारलं आणि त्यानंतर जे तरुणासोबत जे घडलं ते आयुष्यभर तो विसरणार नाही. त्याला कायमची अद्दल घडली. 32 वर्षीय महिलेला अनोळखी नंबरवरुन फोन आला. त्या महिलेनं फोन उचलला आणि त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. भाईंदरच्या उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला अनोळखी क्रमांकावरून कॉल करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने थेट महिलेला "चल आपण गोराईला फिरायला जाऊ, येते का?" असा प्रश्न त्या व्यक्तीनं विचारला. या वक्तव्यामुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. या घटनेनंतर पीडित महिलेने तातडीनं उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, हा कॉल संजय दालमेत नावाच्या 35 वर्षीय तरुणाने पाली इथून केला होता.
advertisement
पीडितेच्या फिर्यादीवरून उत्तन सागरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी संजय दालमेत याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याने, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशाप्रकारे फोन करुण विचारणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 12:51 PM IST


