Navale Bridge : नवले पुलावर मृत्यूचं 'वळण', 'हा' रस्ता पुण्यातील मृत्यूचं हॉटस्पॉट, एकाच ठिकाणी का जातायत जीव?

Last Updated:

पुणे सातारा हायवेवर अनेक वाहनांना धडक देत हा कंटेनर पुढे आला आणि यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

News18
News18
पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघातात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक, जिथे अपघात झाला तिथल्या घटनास्थळापासून जवळपास एक किलोमीटर हा कंटेनर इतर वाहनांना धडक देत दिल्याची माहिती आहे. पुणे सातारा हायवेवर अनेक वाहनांना धडक देत हा कंटेनर पुढे आला आणि यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मात्र नवले पुलावर वारंवार अपघाताचे कारण हे त्याची चुकीची रचना असे अनेक अहवालात समोर आले आहे.
बंगलोरहून- पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कात्रजचा नवीन बोगदा आहे. हा बोगदा ओलांडला की नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. या उतारामुळे चालकाचं ट्रक किंवा गाडीवरील नियंत्रण सुटतं. कारण रचनाच मुळात चुकीची झालेली आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. अपघात प्रवण क्षेत्राची तपासणी करण्यासाठी अनेक समिती नेमण्यात आल्या यातून महामार्गाची बांधणी चुकल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र त्यानंतर त्यावर काय उपाय करायचा यासाठी काही समित्या नेमण्यात आल्या तरीदेखील अपघातांचे सत्र थांबले नाही. कारण अपघातावर जे उपाय सुचवण्यात आले ते जुजबी स्वरुपाचे होते, तात्पुरते होते. वाहनाच्या वेगाच्या निय रम्बलर उभारणे.
advertisement
कात्रजच्या बोगद्यातून जेव्हा एखादे वाहन येते त्यावेळी तीव्र उतार आहे. त्याला तिथे वळण देखील घ्यायचे असते अनेकदा मोठ्या वाहनांचे त्याठिकाणी नियंत्रण सुटते, ब्रेक फेल होतात आतापर्यंतच्या अपघातात पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं अपघात प्रवण क्षेत्र किंवा सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत, असे म्हटले तर अतिशोयक्त ठरणार नाही. कारण आतापर्यंत नवले ब्रीजवर झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तरी देखील महमार्गाची रचना मात्र बदलली नाही. मोठा अपघात झाला तर NHAI कडून तात्पुरते उपाय केले जातात आणि पुन्हा काही दिवसात दुसरा अपघात होतो.
advertisement

नवले पुलानं घेतला दोन वर्षात 66 जणांचा जीव

नवले पुलावर अशाप्रकारचा भीषण अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. 2014 पासून आतापर्यंत 2022 पर्यंत दरी पुल ते नवले पुल आणि धायरी पुल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 185 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे 66 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत.
advertisement

नेमकं काय घडलं?

दोन कंटेनर आणि त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. परंतु दुर्दैवाने या घटनेत कंटेनर मधून दोन पुरुष व कारमधून दोन पुरुष दोन महिला व एक मुलगी असे एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बऱ्याच वाहनांना धडक दिली होती आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Navale Bridge : नवले पुलावर मृत्यूचं 'वळण', 'हा' रस्ता पुण्यातील मृत्यूचं हॉटस्पॉट, एकाच ठिकाणी का जातायत जीव?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement