Pune VIDEO : ज्या रस्त्यावर दहशत माजवली, तिकडेच पोलिसांनी उतरवला माज, भररस्त्यात गुडघ्यावर बसवून धिंड काढली

Last Updated:

हडपसर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपीची गुडघ्यावर बसून धिंड काढली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील ह़डपसर पोलिसांनी शेअर केला आहे.

Pune News : अभिजीत पोते, पुणे : पुण्यात दहशत माजवून भाईगिरी केल्याच्या अनेक घटना घडत असतात. या घटनांवर चाप बसवण्यासाठी पोलिसांकडून देखील कारवाईचा बडगा उगारला जातो.सध्या एका घटनेत एका व्यक्तीने भररस्त्यात दुसऱ्या गाडीच्या काच फोडून दशहत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.या व्हिडिओनंतर आता हडपसर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपीची गुडघ्यावर बसून धिंड काढली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील ह़डपसर पोलिसांनी शेअर केला आहे.
खरं तर काही दिवसांपुर्वीच पुण्यातील एका स्कूल बस चालकाने एका टेम्पो चालकाच्या टेम्पोची काच फोडून त्याला शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेआधी दोघांचा एक किरकोळ अपघात झाला असल्याची माहिती आहे.
त्यामुळे रागाच्या भरात स्कूल बस चालक टेम्पो वाल्याला धमकी देत म्हणतो, तु माझ्या नादी लागू नको आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायाचाय तो दे,असे म्हणत त्याने दादागिरी करत टेम्पो चालकावर हात उगारला होता. त्यानंतर पुढे जाऊन त्याने टेम्पो चालकाच्या गाडीची काच फोडली होती.त्यानंतर माझं नाव सुरज पाटील आहे ज्या कुणाला सांगायचंय सांग असं म्हणत त्याने सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा परिसरात घडली होती.
advertisement
या घटनेनंतर हडपसर पोलिसांनी आरोपी सूरज पाटील याला शोधून काढत त्याचा माज उतरवला आहे. पोलिसांनी आरोपी सूरज पाटीलला ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. त्याच हद्दीतील रस्त्यावर गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड काढली होती. त्यामुळे दहशत माजवणाऱ्या सुरज पाटील याचा पोलिसांनी माज उतरवला आहे. या संदर्भातला व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे.
advertisement
दरम्यान प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपासही सूरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune VIDEO : ज्या रस्त्यावर दहशत माजवली, तिकडेच पोलिसांनी उतरवला माज, भररस्त्यात गुडघ्यावर बसवून धिंड काढली
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement