Pune Crime : घायवळ गँगकडून पुण्यात बेछूट गोळीबार! 200 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन, पण पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

Last Updated:

Pune Nilesh Ghywal Gang Firing : चालत जायचं म्हटलं तर पोलीस स्टेशनपासून घटनास्थळ दोन मिनिटाच्या अंतरावर आहे. अंदाजे अंतर 200 मीटर आहे. पण स्थानिक नागरिकांनी सांगितलं की घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस घटनेच्या ठिकाणी आले.

Pune Nilesh Ghywal Gang Firing
Pune Nilesh Ghywal Gang Firing
Pune Crime News : पुणे शहरातील टोळीयुद्धामुळे एकीकडे नागरिकांचा जीव धोक्यात आला असताना आता पुणे पोलिसांच्या (Pune Police) कार्यशैलीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोथरूड परिसरातील (Pune Kothrud) निलेश घायवळ टोळीतील (Nilesh Ghywal Gang) सदस्यांनी कोथरूड भागामध्ये एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली गुरूवारी मध्यरात्री घडली होती. अशातच घटनेनंतर जे काही झालं, ते ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.

दोन मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन

गोळीबाराच्या घटनेनंतर प्रकाश धुमाळ यांना मदत करणारे स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी नेमकं काय झालं? यावर खुलासा एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. पोलीस स्टेशन हे ही गोळीबाराची घटना घडली तिथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. चालत जायचं म्हटलं तर पोलीस स्टेशनपासून घटनास्थळ दोन मिनिटाच्या अंतरावर आहे. अंदाजे अंतर 200 मीटर आहे. पण स्थानिक नागरिकांनी सांगितलं की घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस घटनेच्या ठिकाणी आले.
advertisement

पोलिसांना फोन केला अन्...

प्रकाश धुमाळ हे अर्धा तास आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले होते. स्थानिक नागरिकांनी प्रकाश धुमाळ यांना पाणी दिलं आणि मदत केली, पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्या ठिकाणी आले, असंही सचिन गोपाळघरे यांनी सांगितलं. घायवळ गँगकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन गोळ्या प्रकाश घुमाळ यांना लागल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांनी एका इमारतीच्या दिशेने धाव घेतली.
advertisement

पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार करण्यात आला होता. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत‌. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : घायवळ गँगकडून पुण्यात बेछूट गोळीबार! 200 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन, पण पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement