रंगाऐवजी रक्तानं माखल्या भिंती! पुण्यात बंगल्याचं रंगकाम करताना मजुराचा भयंकर शेवट; ठेकेदारावर गुन्हा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
, एका बंगल्यात रंगकाम करत असताना उंचावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
पुणे: कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात रंगकाम करत असताना उंचावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मजुरांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत सहकारनगर पोलिसांनी संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
सहकारनगर येथील गणेशदत्त सोसायटीमधील एका बंगल्यात सध्या नूतनीकरणाचे आणि रंगकामाचे काम सुरू आहे. दीपक से गुप्ता असे या अपघातात प्राण गमावलेल्या मजुराचे नाव असून, दीनानाथ मेणक चौधरी असे जखमी मजुराचे नाव आहे. रंगकाम करत असताना अचानक दोघांचाही तोल गेला आणि ते उंचावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात दीपक गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीनानाथ चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
या प्रकरणी मुन्ना जोखुप्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कंत्राटदार अफसर शेख आणि क्रांतीलाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांना उंचावर काम करताना आवश्यक असणारे सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा सुरक्षित मचान पुरवण्यात आले नव्हते. मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती असतानाही त्यांना कामावर लावल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः ठेकेदाराची असते. या घटनेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खाजगी बंगले किंवा इमारतींच्या कामात अनेकदा मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे अशा जीवघेण्या घटना घडतात.
या घटनेमुळे कामगार वर्गात संताप व्यक्त होत असून, कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षा ऑडिट करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी ठेकेदारावर नेमकी काय कारवाई होते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 18, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रंगाऐवजी रक्तानं माखल्या भिंती! पुण्यात बंगल्याचं रंगकाम करताना मजुराचा भयंकर शेवट; ठेकेदारावर गुन्हा







