पुणेकरांसाठी गुड न्यूज! लक्ष्मी रोडसह पुण्यातील या 6 वर्दळीच्या रस्त्यांवर 4 रुपयात पार्किंग, असा आहे प्लॅन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शिस्तबद्ध पार्किंगसाठी पुणे महानगरपालिकेने सहा महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शिस्तबद्ध पार्किंगसाठी पुणे महानगरपालिकेने सहा महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेच्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने त्याला पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
या सहा रस्त्यांवर शुल्क लागू होणार: १. लक्ष्मी रोड २. जंगली महाराज (JM) रस्ता ३. फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्ता ४. बालेवाडी हायस्ट्रीट ५. विमाननगर रस्ता ६. बिबवेवाडी मुख्य रस्ता
पार्किंगचे दर आणि क्षमता: महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार, दुचाकी वाहनांसाठी प्रतितास ४ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या सहा रस्त्यांवर एकूण ६,३४४ दुचाकी आणि ६१८ चारचाकी वाहने पार्क करण्याची क्षमता असून, या माध्यमातून पालिकेला वर्षाला सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
पुण्यातील बाजारपेठांमध्ये, विशेषतः लक्ष्मी रोडवर, स्थानिक व्यावसायिक आणि कर्मचारी सकाळीच वाहने उभी करतात. ज्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना जागा मिळत नाही. तसेच, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. सध्या महापालिकेच्या वाहनतळांवर तासाला २० रुपये मोजावे लागतात, त्या तुलनेत रस्त्यावरील हे पार्किंग शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असेल.
advertisement
२०१८ मध्ये मंजुरी मिळालेल्या या पार्किंग धोरणाला तब्बल सात वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 12:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी गुड न्यूज! लक्ष्मी रोडसह पुण्यातील या 6 वर्दळीच्या रस्त्यांवर 4 रुपयात पार्किंग, असा आहे प्लॅन










