हरवलेल्या फोनची 'रिंगटोन' पुन्हा वाजली! सांगवी पोलिसांची मोठी कारवाई; पुणेच नाही तर परराज्यांतूनही परत आणले 50 मोबाईल

Last Updated:

पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शोधलेले तब्बल ५० मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना नुकतेच एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केले.

हरवलेले फोन सापडले (प्रतिकात्मक फोटो)
हरवलेले फोन सापडले (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : आपला मोबाईल चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्यास तो पुन्हा मिळेल, याची आशा सहसा नागरिक सोडून देतात. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सांगवी-दापोडी पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शोधलेले तब्बल ५० मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना नुकतेच एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केले.
राज्याबाहेरूनही शोधले मोबाईल: दापोडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने (DB) या मोहिमेसाठी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलची मोठी मदत घेतली. गहाळ झालेले हे फोन केवळ पिंपरी-चिंचवड किंवा पुणे शहरातूनच नव्हे, तर राज्यातील विविध जिल्हे आणि थेट परराज्यांतूनही हस्तगत करण्यात आले आहेत. सुमारे ५ लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
advertisement
आपल्या कष्टाच्या पैशातून घेतलेला फोन पुन्हा हातात मिळाल्यावर अनेक नागरिकांनी भावूक होत पोलिसांचे आभार मानले. "आमचा मोबाईल कधीच परत मिळणार नाही असे आम्हाला वाटले होते, पण पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज आमचा फोन परत मिळाला आहे," अशा प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.
advertisement
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
हरवलेल्या फोनची 'रिंगटोन' पुन्हा वाजली! सांगवी पोलिसांची मोठी कारवाई; पुणेच नाही तर परराज्यांतूनही परत आणले 50 मोबाईल
Next Article
advertisement
Santosh Deshmukh Beed Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप, आरोपींनी नेमंक काय म्हटलं?
संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्
  • संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्

  • संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्

  • संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्

View All
advertisement