Pune Video: 'ए हा लय बोलतोय रे..', पुण्यात पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण, धडकी भरवणारा Video समोर

Last Updated:

आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना असून शहरातील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune Petrol Pump Video
Pune Petrol Pump Video
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. वानवडी परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून कामगाराला जबर मारहाण करण्यात आली. आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना असून शहरातील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही घटना १६ नोव्हेंबरच्या रात्री घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, पेट्रोल भरण्याच्या विषयावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या वादाचे मारहाणीमध्ये रुपांतर झाले. दोन आरोपींनी कामगाराला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. यानंतर पुणे पोलिसांनी या आरोपींची धिंड काढत त्यांना चांगला धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ वानवडीच नव्हे तर शहरातील इतर भागांतही मागील काही दिवसांत अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. आठवड्यातील दोन गंभीर मारहाणीच्या प्रकरणांमुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पेट्रोल डीलर्स असोसिएशनने कठोर भूमिका घेतली आहे. सततच्या हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे सांगत असोसिएशनने इशारा दिला आहे की, परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातील सर्व पेट्रोल पंप संध्याकाळी ७ नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
advertisement
असोसिएशनचे म्हणणे आहे की, कर्मचारी सुरक्षित नसतील तर सेवा सुरळीत ठेवणे कठीण होत आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलून पेट्रोल पंपांवरील सुरक्षा वाढवावी, अन्यथा सेवेत अडथळा आणण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. सलग घडत असलेल्या घटनांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Video: 'ए हा लय बोलतोय रे..', पुण्यात पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण, धडकी भरवणारा Video समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement