पुण्यातील TCS ऑफिसमधील 2500 कर्मचाऱ्यांना नारळ, हकालपट्टी नाही राजीनामा द्या! IT कंपन्यांमध्ये खळबळ

Last Updated:

TCS Pune layoffs 2025 : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TCS मध्ये मोठी कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती मिळाली आहे. याचा मोठा फटका पुणे ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बसला आहे.

Pune TCS layoffs 2025 forced around 2500 employees
Pune TCS layoffs 2025 forced around 2500 employees
Pune TCS Layoffs : गेल्या दोन वर्षांपासून आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या कपातीचं संकट आहे. गुगलसारख्या कंपनीने देखील कर्मचारी कपात केल्यानंतर आता पुण्यातील आणि देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने मोठा निर्णय घेतला आहे. टीसीएसच्या पुण्याच्या कार्यालयातील 2500 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं

NITES च्या दाव्यानुसार, टीसीएसच्या पुण्याच्या ऑफिसमधून अलीकडे 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं किंवा अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. कर्मचारी संघटनेनं हे गंभीर संकट असून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काही कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्‍यांना मेल करून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे टीसीएसनं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
advertisement

केवळ मर्यादित संख्येत कर्मचाऱ्यांवर परिणाम - TCS

कंपनीकडून जारी पत्रकात म्हटलं की, जी माहिती दिली जातीय ती चुकीची आणि भ्रामक आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. आमच्या अलीकडील अभियानात केवळ मर्यादित संख्येत कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. ज्यांच्यावर परिणाम झालाय, त्यांची पूर्ण देखभाल आणि सेवरेंस पॅकेज दिलं गेलं आहे, जे त्यांच्या अधिकारानुसार होतं, असं TCS ने म्हटलं आहे.
advertisement

इतर आयटी कंपन्यांवर प्रभाव पडणार?

या संदर्भात NITES ने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मात्र, टीसीएसकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले असून, कंपनीने स्पष्ट केलं की, संस्थेतील कौशल्य पुनर्रचना उपक्रमामुळे केवळ मर्यादित संख्येतील कर्मचारीच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे आता पुण्यातील इतर आयटी कंपन्यांवर याचा प्रभाव पडणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement

12,261 कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा

दरम्यान, एनआयटीईएसच्या प्रतिनिधित्वाच्या आधारे केंद्रीय श्रम मंत्रालयाने महाराष्ट्राच्या श्रम सचिवांना या प्रकरणात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सलुजा यांनी सांगितलं. कंपनीने यावर्षी जूनमध्ये आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दोन टक्के म्हणजेच 12,261 कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. ज्यामध्ये बहुतांश मध्यम व वरिष्ठ पदावरील कर्मचारी प्रभावित झाले होते. एनआयटीईएसने असा आरोप केला आहे की, टीसीएसने केलेली ही कर्मचारी कपात औद्योगिक वाद अधिनियम, 1947 चे गंभीर उल्लंघन आहे, कारण या संदर्भात सरकारला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील TCS ऑफिसमधील 2500 कर्मचाऱ्यांना नारळ, हकालपट्टी नाही राजीनामा द्या! IT कंपन्यांमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement