सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम कड्यावरून पडलाच नाही? स्वत:च रचला बनाव, पोलिसांकडून भलतीच माहिती समोर

Last Updated:

गेल्या पाच दिवसांपासून पुणेकरांची धाकधूक वाढवणाऱ्या सिंहगड किल्ल्यावरील थरारनाट्याचा अखेर शेवट झाला आहे.

News18
News18
पुणे: गेल्या पाच दिवसांपासून पुणेकरांची धाकधूक वाढवणाऱ्या सिंहगड किल्ल्यावरील थरारनाट्याचा अखेर शेवट झाला आहे. तानाजी कड्यावरून 'गायब' झालेला गौतम गायकवाड हा तरुण काल (रविवार, २४ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास जिवंत अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात गौतमने स्वत:च बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच असं करण्यामागे एक धक्कादायक कारण असल्याचे समोर आले आहे.

बेपत्ता होण्याचे संभाव्य कारण काय?

सिंहगडाच्या खोल दरीत बेपत्ता झालेला गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहे. तो सध्या हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गौतमवर मोठे कर्ज होते. या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा, असा संशय आहे.
गौतम गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत (महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी) सिंहगड पाहण्यासाठी आला होता. बुधवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी तानाजी कड्यावर असताना तो लघुशंकेला जातो असे सांगून दूर गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने मित्रांनी पोलिसांना तो कड्यावरून घसरून दरीत पडल्याची माहिती दिली होती.
advertisement

शोधमोहीम ते सीसीटीव्हीचा 'तो' दावा

गौतम गायकवाड हा तानाजी कड्यावरून पडल्याच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन दल आणि हवेली पोलीस कसून शोध घेत होते. मात्र, याच दरम्यान सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गौतम पळत आणि लपून जाताना दिसल्याचा दावा करण्यात आला. यामुळे तो दरीत पडला की त्याने बनाव रचला, या संदर्भात पोलीस तपास करत होते. आता त्याने हा बनाव रचला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement

स्थानिक नागरिकांमुळे जीव वाचला

काल (रविवार, २४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात काहीशी हालचाल जाणवली. त्यांनी तातडीने शोध घेतला असता गौतम गायकवाड त्यांना जिवंत अवस्थेत आढळून आला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून गडावरील वाहनतळाच्या दिशेने आणले. हवेली पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम कड्यावरून पडलाच नाही? स्वत:च रचला बनाव, पोलिसांकडून भलतीच माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement