Bhimashankar Ropeway : भाविकांसाठी मोठी भेट! भीमाशंकरला 'रोप वे' सेवा होणार सुरु

Last Updated:

Bhimashankar Ropeway Project : भीमाशंकर रोप-वे प्रकल्पाद्वारे भाविकांना सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सुमारे 3 किलोमीटरचा रोप-वे रस्ता प्रवास वेळ वाचवेल.

News18
News18
मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, भीमाशंकरला पोहोचण्यासाठीचा सध्याचा रस्ता पर्वतीय असल्यामुळे आणि खूप लांब असल्यामुळे प्रवास कठीण आणि वेळखाऊ ठरतो.
मुंबई-पुणे परिसरातून भाविकांना लोणावळा-तळेगाव-चाकण-राजगुरुनगर-मंचर मार्गाने सुमारे 220 ते 240 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास पर्वतीय वळणांनी भरलेला असल्यामुळे साधारण पाच ते सहा तास लागतात. या समस्येचा उपाय म्हणून राज्य सरकारने भीमाशंकरसाठी रोप-वे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
हा प्रकल्प कर्जत-नेरुळ मार्गावरून रोप-वे तयार करण्यावर आधारित आहे. प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबवण्याचा विचार केला जात असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भाविकांना सुरक्षित आणि कमी वेळेत पर्वतावर पोहोचविणा हा आहे.
advertisement
प्रस्तावित रोप-वे मार्ग सुमारे 3 किलोमीटरचा असेल ज्यामुळे सध्याच्या रस्त्यावरील सुमारे 100 किलोमीटर प्रवासाची बचत होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रोप-वे सुरू झाल्यास, भाविक कर्जत किंवा नेरुळ येथून गाडीने थेट रोप-वे स्थानकापर्यंत येऊन पुढचा प्रवास केबल कारद्वारे करू शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ निम्मा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय रोप-वेमुळे इंधनाची बचत देखील मोठ्या प्रमाणावर होईल. पर्यटन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, या मार्गामुळे दरवर्षी लाखो लिटर डिझेल-पेट्रोलची बचत होईल. त्यामुळे प्रवास अधिक पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.
advertisement
ही सुविधा केवळ वेळ आणि इंधन वाचविण्यापुरती मर्यादित नाही. रोप-वेचा प्रवास भाविकांसाठी सुलभ, आरामदायी आणि सुरक्षित असेल. तसेच प्रवासाचा अनुभव सुधारून भाविकांना धार्मिक स्थळापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.
सरकार आणि पर्यटन विभागाच्या या प्रकल्पामुळे भविष्यात भीमाशंकरला जाणारे लाखो भाविक आता सुलभ आणि वेगवान प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील. ही योजना धार्मिक पर्यटनाला चालना देईल आणि महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी ही एक मोठी सुविधा ठरेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Bhimashankar Ropeway : भाविकांसाठी मोठी भेट! भीमाशंकरला 'रोप वे' सेवा होणार सुरु
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement