नियतीचा क्रूर खेळ! 'ते पुन्हा घरी पोहोचलेच नाही'; देवदर्शनाहून परतणाऱ्या तरुणांचा भयानक शेवट

Last Updated:

देवदर्शन आटोपून तिघेही घरी परत येत होते. मात्र, शिंदवणे घाटातून जात असताना त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली.

दुचाकीचा भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
दुचाकीचा भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : अपघाताची एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यात नारायणपूर येथील देवदर्शनासाठी गेलेल्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन तरुणांवर काळाने घाला घातला आहे. शिंदवणे घाटात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण किरकोळ जखमी आहे.
समीर संभाजी ढमढेरे (वय २१) आणि सार्थक विजय ढमढेरे (वय २०, दोघे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत.
तळेगाव ढमढेरे, भीमाशेत येथील दीपक ढमढेरे, समीर ढमढेरे आणि सार्थक ढमढेरे हे तिघे मित्र एकाच दुचाकीवरून ११ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून तिघेही घरी परत येत होते. मात्र, शिंदवणे घाटातून जात असताना त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली.
advertisement
समोरून अतिवेगाने आलेल्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही मित्र गंभीर जखमी झाले. यामध्ये समीर ढमढेरे आणि सार्थक ढमढेरे यांना डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तर दीपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.
advertisement
अपघात घडताच टेम्पो चालक आपला टेम्पो घटनास्थळी सोडून तात्काळ पळून गेला. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १६) समीर आणि सार्थक यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे तळेगाव ढमढेरे आणि भीमाशेत परिसरात शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या दोन तरुण जीवांचा अपघातात अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
नियतीचा क्रूर खेळ! 'ते पुन्हा घरी पोहोचलेच नाही'; देवदर्शनाहून परतणाऱ्या तरुणांचा भयानक शेवट
Next Article
advertisement
Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement