Pune: एका पुणेकराने कार्यक्रमात विचारला मुद्दाचा प्रश्न,अजितदादा वैतागले अन् हात जोडले, VIDEO

Last Updated:

पिंपरी शहरातील वृक्ष तोडी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली

News18
News18
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये लोकांशी बोलताना अजितदादा कमालीचे वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजितदादांनी तर 'कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो', असं वैतागून बोलून धन्यवाद मानले.
पिंपरी शहरातील वृक्ष तोडी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या विकासावर भर देत जोरदार भाषण केलं. पण भाषण जसं संपत आलं, तसं सभागृहामधून एक व्यक्ती उभी राहिली. तिने पिंपरी शहरात कशा प्रकारे वृक्षतोड सुरू आहे, अशी माहिती दिली आणि पालकमंत्री म्हणून तुम्ही हे बंद करावे, अशी विनंती केली.
advertisement
सामाजिक कार्यकर्त्याचं सगळू ऐकून घेतल्यानंतर अजितदादा म्हणाले की,  कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो.  कुणीही उठते आणि मला उपदेश करायला लागतं. सगळा मक्ता मीच घेतला. उपदेश करायचे, ठीक आहे, धन्यवाद' असं म्हणून हात जोडून भाषण आटोपतं घेतलं. अजितदादांच्या याा वक्तव्यामुळे सभागृहात मात्र एकच हश्शा पिकली.
advertisement
'सयाजी शिंदेंचं ट्री मॅन म्हणून केलं कौतुक'
दरम्यान,  'आपण आता सयाजींना ट्री मॅन म्हणूया शासकीय कार्यक्रमात रोपे देण्याचा उपक्रम दिसतोय पण ती लावल्याही गेले पाहिजे.  सयाजीराव आणि कुटुंब सामान्य माणसं आहेत.  अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र वाचलं जातं होतं तेव्हा भावूक झालो. सयाजी शिंदे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका वास्तववादी आहे.  त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली.  दाक्षिणात्य प्रेक्षकांनी या मराठी कलाकाराला अक्षरशः डोक्यावर घेतलं पण ते पडद्या बाहेरही हिरो आहेत त्याचं पर्यावरणाचे कामं मोठ आहे.  ते सडतोड स्पष्ट बोलतात त्यांचा आणि माझा हा गुण सारखा आहे. गडी अंगान उभा न आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा. हे गाणे आठवले. सयाजी शिंदे जेवढे धाडसी तेवढेच भावूक आहेत ते मित्रता मनापासून जपतात. शिवाजी शिंदे त्यांचे जिवलग मित्र आहेत, सयाजीने गावाकडच्या या मित्राला विमान सफर घडवली, असा मित्र प्रत्येकाला मिळावा, असं म्हणत अजितदादांनी सयाजी शिंदेंचं कौतुक केलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: एका पुणेकराने कार्यक्रमात विचारला मुद्दाचा प्रश्न,अजितदादा वैतागले अन् हात जोडले, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement