अजितदादांची साथ सोडणार? शिवसेना, भाजपकडून ऑफर आली का? रुपाली ठोबरेंनी स्पष्टचं सांगितलं

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली वादाचा अंक काही संपायचा नाव घेत नाहीये.

News18
News18
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली वादाचा अंक काही संपायचा नाव घेत नाहीये. रुपाली ठोंबरे यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली आहे. पण,मला दोन्ही शिवसेनेतील विचारणा करण्यात आली.भाजपमधून देखील ऑफर आली होती. मला विचारल गेले मात्र मी असा कोणताही विचार नाही, असा खुलासा रुपाली ठोंबरे यांनी केला.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. "मला पक्ष्याकडून खुलासा पत्र मागितलं होतं. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे. राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे, प्रदेशाध्यक्षबद्दल बोलले आहे. फलटण प्रकरणावर जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेल नाही, असं रुपाली ठोंबरे यांनी ठामपणे सांगितलं.
advertisement
अजितदादांनी दिलं आश्वासन
'प्रवक्ते पद का काढलं मला माहिती नाही.  याची माहिती अजित दादांना नव्हती. मला, अमोल मिटकरी, आणि वैशाली नागवडे यांना का नाकारलं हे आम्ही अजितदादांना विचारलं. दोन दिवसात अजित पवार पाहतो सांगतो.आमची काय चूक झाली, असं अजित पवारांना विचारलं. 8 महिन्यापासून पक्षात हे सगळं चालू होतं, असंही ठोंबरेंनी सांगितलं.
advertisement
इतर पक्षातून ऑफर आली का? 
काही पक्ष काही नेते खरं चांगले आहेत, काम करणाऱ्या व्यक्तीला. मला दोन्ही शिवसेनेतील विचारणा करण्यात आली.भाजपमधून देखील ऑफर आली होती. मला विचारल गेले मात्र मी असा कोणताही विचार नाही. दोन्ही शिवसेनेतील विचारणा करण्यात आली.भाजपमधून देखील ऑफर आली होती. मला विचारल गेले मात्र मी असा कोणताही विचार नाही, असं ठोबरेंनी स्पष्ट सांगितलं.
advertisement
'मी निवडणूक लढवणारी कार्यकर्ती आहे. सगळ्यांना न्याय मिळवा म्हणून आम्ही बोलत होतो. संयमांची लढाई करण्याची हिम्मत आहे म्हणून दोन दिवस माध्यमासमोर आले नाही. पीडितेच्या कुटुंबाची दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. आयोगाच्या त्रुटी राहिल्या त्याबद्दल जाब विचारण्याचा अधिकार तटकरेंना आहे. माझं खचीक्करण होणार नाही
'मी लढत राहणार'
'खडक पोलीस स्थानाकात गुन्हा दाखल केला आहे. हा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्यावर लोकांसाठी अनेक गुन्हे दाखल आहेत. आमच्याच पक्षातील नेत्यांचा फोन गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची कार्यकर्ता म्हणून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे,  मी लढत राहणार आहे. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, असं सांगत ठोंबरेंनी चाकणकरांविरोधात लढाई कायम राहिल असे संकेत दिले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अजितदादांची साथ सोडणार? शिवसेना, भाजपकडून ऑफर आली का? रुपाली ठोबरेंनी स्पष्टचं सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement