Bhaubeej 2024: भावाला ओवाळण्यासाठी 2 शुभ मुहूर्त! सकाळी चुकला तर दुपारी 1 तासाचा अवधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Bhaubeej 2024: भाऊ-बहिणीतील प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीज सण आज रविवार, 3 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना औक्षण करून टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
मुंबई : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात. भाऊ-बहिणीतील प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीज सण आज रविवार, 3 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना औक्षण करून टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. असे केल्याने भावा-बहिणीच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी यमुनेने तिचा भाऊ यमाला पाहुणचार करून भोजन दिले. तेव्हा यमराजाने हे वरदान दिले होते की, जो कोणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करेल त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. यमुना ही सूर्याची कन्या मानली जाते. त्यामुळे या दिवशी यमुनेत स्नान करून यमुना आणि यमराजाची पूजा करणे महत्त्वाचे आहे. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कधी आहे? भावाचे औक्षण कधी करावे? याविषयी ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
advertisement
भाऊबीज शुभ मुहूर्त -
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, भाऊबीज 3 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जात आहे. द्वितीया तिथी शनिवारी रात्री 08.22 वाजता सुरू होत आहे, ती रविवारी रात्री 11.06 वाजता संपेल.
औक्षण-ओवाळण्याचा मुहुर्त -
रविवारी सकाळी ओवाळण्याचा मुहूर्त 6.45 ते 11.38 पर्यंत असेल. या वेळात औक्षण करून टिळा लावल्यास शुभ फळ मिळेल. यानंतर तुम्ही गुलिक कालामध्ये दुपारी 2:52 ते 4:05 पर्यंत भावाला ओवाळू शकता.
advertisement
भाऊबीजेची पूजा -
परंपरेनुसार घराच्या अंगणात शेणाने यमुना, यम आणि यामीनचे आकार बनवा. त्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य दिवा, अगरबत्ती, कुंकू, फुले, नारळ, फळे आणि पूजा थाळी तयार करा. यानंतर बहिणींनी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि ‘गंगा पूजे यमुना को यमी पूजे यमराज को, सुभद्रा पूजा कृष्ण को, गंगा यमुना नीर बहे मेरे भाई की आयु बढे' या मंत्राचा जप करावा. नंतर भावाचे औक्षण करावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 6:57 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Bhaubeej 2024: भावाला ओवाळण्यासाठी 2 शुभ मुहूर्त! सकाळी चुकला तर दुपारी 1 तासाचा अवधी