Mohini Ekadashi : 'या' दिवशी रात्रीच्या अंधारात करा 'हे' उपाय; लगेच मिळेल अडकलेला पैसा अन् घरात नांदेल शांतता
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
मोहीनी एकादशी ही वैशाख महिन्यात येणारी अत्यंत पवित्र व्रत दिन आहे. यंदा 8 मे रोजी हे व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णू व लक्ष्मीदेवीची पूजा केल्यास आरोग्य, धन, सौख्य व यश प्राप्त होते. तुळशीच्या...
Mohini Ekadashi : हिंदू धर्मात वर्षभरात चोवीस एकादशी येतात. प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी असते. असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. त्यातल्या त्यात वैशाख महिना तर माघ आणि कार्तिक महिन्याइतकाच पवित्र मानला जातो. त्यामुळे वैशाख महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. याच महिन्यात मोहिनी एकादशी येणार आहे. उज्जैनच्या आचार्यांच्या म्हणण्यानुसार, या दिवशी काही खास आणि अचूक उपाय केल्यास वर्षभर लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद टिकून राहतो.
मोहिनी एकादशी कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी साजरी केली जाते. ही तिथी 7 मे रोजी सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल आणि 8 मे रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहील. उदय तिथीनुसार, मोहिनी एकादशीचा उपवास 8 मे रोजी केला जाईल.
हे उपाय नक्की करा
advertisement
तुळस : मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचं ध्यान करत तुळशीला सात प्रदक्षिणा करा. असं केल्याने तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.
गोमती चक्र : जर तुम्हाला व्यवसायात अडचणी येत असतील, तर मोहिनी एकादशीला 11 गोमती चक्र आणि 3 लहान एकमुखी नारळ घ्या. ते देवघरात स्थापित करा आणि धूप-दीप लावून त्यांची पूजा करा. पूजेनंतर गोमती चक्र आणि एकमुखी नारळ एका पिवळ्या कपड्यात बांधून ऑफिस किंवा दुकानाच्या मुख्य दारावर टांगा. या उपायाने तुमचा व्यवसाय पुन्हा सुरू होईल.
advertisement
केळीचं झाड : घरात सतत नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील, तर मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची धूप, दीप, रोळी-तांदूळ इत्यादींनी पूजा करा आणि भगवान विष्णूंना केशराने मिसळलेलं दूध अर्पण करा. काही मिनिटांनंतर ते प्रसाद म्हणून प्या. असं केल्याने नवरा-बायकोमधील संबंध मधुर होतील.
अडकलेले पैसे : जर तुमचे पैसे कुणाकडे अडकले असतील, तर मोहिनी एकादशीच्या दिवशी एक गोमती चक्र घ्या आणि संध्याकाळी अंधार झाल्यावर एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा घराबाहेर रिकाम्या जागी खड्डा खणून ते गोमती चक्र भगवान विष्णूचं नाव घेत पुरून टाका. त्या व्यक्तीने तुमचे पैसे परत करावेत, अशी देवाला प्रार्थना करा. या उपायाने तुमचे काम होईल.
advertisement
हे ही वाचा : Vastu Tips For Sleeping: रात्री झोपताना डोकं या दिशेला करावं! अनेकजण करतात चूक, फायदे अनेक
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2025 10:43 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mohini Ekadashi : 'या' दिवशी रात्रीच्या अंधारात करा 'हे' उपाय; लगेच मिळेल अडकलेला पैसा अन् घरात नांदेल शांतता