Mokshada Ekadashi: आज मोक्षदा एकादशी! पहा पूजा-मुहूर्त, उपवास सोडण्याची वेळ, व्रताचे धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mokshada Ekadashi: धार्मिक शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यास पितरांना त्यांच्या कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळते. व्यक्तीची पापे नष्ट होतात. म्हणून ती पुण्यदायिनी आणि मोक्षदायिनी एकादशी मानली जाते. म्हणूनच याला मोक्षदा एकादशी म्हणतात.
मुंबई, 22 डिसेंबर : हिंदू धर्मात सर्व एकादशी तिथी विशेष मानल्या जातात. एकादशीचं व्रत ठेवून भगवान विष्णूची पूजा केल्यानं जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. काही एकादशी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यामध्ये मोक्षदा एकादशीचा समावेश होतो. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी येते. या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे, विधीपूर्वक पूजा करणे आणि पवित्र नदीत स्नान केल्याने पितरांचा मोक्ष होतो. धार्मिक शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यास पितरांना त्यांच्या कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळते. व्यक्तीची पापे नष्ट होतात. म्हणून ती पुण्यदायिनी आणि मोक्षदायिनी एकादशी मानली जाते. म्हणूनच याला मोक्षदा एकादशी म्हणतात.
मोक्षदा एकादशीचा शुभ मुहूर्त -
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. पंचांगानुसार, एकादशी तिथी शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8:16 वाजता सुरू होईल आणि शनिवार, 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7:12 वाजता समाप्त होईल. गृहस्थ आणि शैव संप्रदायातील लोकांनी आज 22 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत पाळायचं आहे. वैष्णव पंथाचे लोक 23 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत करणार आहेत. या दिवशी शिवयोगही घडत आहे.
advertisement
मोक्षदा एकादशी 2023 उपवास सोडण्याची वेळ -
आज 22 डिसेंबर रोजी एकादशीचे व्रत करणार्यांसाठी उपवास सोडण्याची वेळ 23 डिसेंबर रोजी दुपारी 01:22 ते 03:26 पर्यंत आहे. तर 23 डिसेंबरला एकादशी व्रत करणाऱ्या लोकांसाठी उपवास सोडण्याची वेळ 24 डिसेंबर रोजी सकाळी 07:11 ते 09:15 पर्यंत असेल. गीता जयंती मोक्षदा एकादशीच्या दिवशीही येते हे लक्षात ठेवा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या मैदानात पांडव अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले. त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता अवश्य पठण करावी.
advertisement
मोक्षदा एकादशीला या वस्तू खरेदी कराव्या -
मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तसेच या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती किंवा मत्स्य मूर्ती खरेदी केल्याने मोठे शुभफळ प्राप्त होईल. चांदीचा मासा खरेदी करणे खूप शुभ राहील. असे केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी राहते, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2023 7:37 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mokshada Ekadashi: आज मोक्षदा एकादशी! पहा पूजा-मुहूर्त, उपवास सोडण्याची वेळ, व्रताचे धार्मिक महत्त्व