द्वितीय माळेला अंबाबाईची महागौरी स्वरुपात पूजा; देवीच्या मनोहारी रूपाचा पाहा Video

Last Updated:

दुर्गेच्या आठव्या रूपाचे नाव महागौरी असून या स्वरूपात कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची पूजा बांधण्यात आली आहे.

+
News18

News18

कोल्हापूर,16 ऑक्टोबर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत वेगवेगळ्या स्वरूपात देवीची पूजा बांधली जाते. त्यानुसारच अश्विन शुद्ध द्वितीयेला 16 ऑक्टोबर रोजी महागौरी स्वरुपातील पूजा बांधण्यात आली आहे. खरंतर सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ असे जे देवी कवच आहे. त्यानुसारच देवी नऊ नांवांनी प्रसिद्ध आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा या नवदुर्गा आहेत. यातीलच दुर्गेच्या आठव्या रूपाचे नाव महागौरी असून या स्वरूपात कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची पूजा बांधण्यात आली आहे.
महागौरी पूर्णतः गौर वर्णाची
देवीच्या या पुजेबद्दल माहिती देताना श्रीपूजक सांगतात की, महागौरी पूर्णतः गौर वर्णाची आहे. तिच्या वर्णाची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांशी करता येईल. 'अष्टवर्षा भवेद गौरी' अर्थात तिचे वय आठ वर्षे मानले जाते. तिचे सर्व वस्त्रालंकार श्वेत वर्णाचे आहेत. ती चतुर्भुजा देवी आहे आणि तिचे वाहन वृषभ आहे. तिच्या उजव्या वरच्या हातात अभय मुद्रा, उजव्या खालच्या हातात त्रिशूळ, वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वरमुद्रा आहे. तिची भावमुद्रा अत्यंत प्रसन्न, शांत आहे.
advertisement
असे पडले महागौरी हे नाव
पार्वतीच्या रूपात तिने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिने प्रतिज्ञा केली होती की, मी वरदान देणाऱ्या शिवाशीच विवाह करेन, कारण त्याच्याशिवाय दुसरा देव मी मानत नाही. तिच्या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर पूर्ण काळे पडले. पुढे तिच्या तपश्चर्येने प्रसन्न आणि संतुष्ट झालेल्या शिवाने तिला गंगेचे पवित्र स्नान घडविले, जेणेकरून तिचे शरीर अत्यंत कांतीमान व गौरवर्णाचे झाले. तेव्हापासून तिचे नांव महागौरी पडले, असे श्रीपूजक सांगतात.
advertisement
नवरात्रीत घटाला फुलांची माळ का वाहतात? कशी सुरू झाली परंपरा?
तिची शक्ति अमोघ आणि फलदायी आहे. तिच्या उपसानेने भक्तांच्या सर्व पापांचे क्षालन होते. तसेच सर्व पूर्वसंचित पापसुद्धा नष्ट होते. भविष्यात येणारी दुःख- दैन्य, पाप-संताप, कधीच येत नाहीत. तो भक्त सर्व प्रकारे पवित्र आणि अक्षय पुण्यांचा अधिकारी होतो. श्री महागौरीचे ध्यानस्मरण, आराधना, उपासना भक्तांच्यासाठी सर्वस्वी कल्याणकारी आहे.
advertisement
तिच्या कृपेने अलौकिक सिद्धी प्राप्त होतात. ती भक्तांचे कष्ट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्येसुद्धा शक्य होऊन जातात. पुराणांमध्ये तिचा महिमा खूप वर्णन केलेला आहे. मानवी प्रवृत्तीला वाईटाकडून चांगल्याकडे नेण्यासाठी आपण तिला सदैव शरण गेले पाहिजे. असे करवीर निवासिनी अंबाबाई देवीची ही पूजा बांधणाऱ्या श्रीपूजक आनंद स. मुनीश्वर, किरण स. मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वरः, स्युनीस्थर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी सांगितले आहे.
advertisement
..तेव्हा गाढवासारखं ओरडायची देवी, विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी माता माहितीये का? Video
दरम्यान हे देवीचे मनोहारी रुप आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात गर्दी करत आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
द्वितीय माळेला अंबाबाईची महागौरी स्वरुपात पूजा; देवीच्या मनोहारी रूपाचा पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement