Christmas 2023 Vastu: घरात या दिशेला लावा ख्रिसमस ट्री, नाही राहणार वास्तूदोष, येशू होईल प्रसन्न
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Christmas 2023 Vastu: ख्रिसमसच्या दिवशी लोक आपली घरं खास पद्धतीने सजवतात. ख्रिसमस ट्री हे आकर्षणाचं केंद्र असतं. ख्रिसमस ट्री लावल्यानं वास्तुदोष दूर होतात असंही मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही येते. मात्र लावताना दिशा लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
मुंबई, 24 डिसेंबर : वर्ष 2023 चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर चालू आहे. डिसेंबरमध्ये येणारा नाताळ सण आता अगदी जवळ आला आहे. ख्रिसमस हा भारतीय वंशाचा सण नसला तरी जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये तो साजरा केला जातो. ख्रिश्चन समुदायासाठी ख्रिसमस हा हिंदूंच्या दिवाळीसारखा मोठा सण आहे. भारतातही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसला 25 डिसेंबर रोजी प्रभु येशूचा जन्मदिवस साजरा केला जातो. असे मानले जाते की, ख्रिसमसच्या दिवशी सांता मुलांसाठी भेटवस्तू आणतो, ज्याची मुले उत्सुकतेने वाट पाहत असतात.
ख्रिसमसच्या दिवशी लोक आपली घरं खास पद्धतीने सजवतात. ख्रिसमस ट्री हे आकर्षणाचं केंद्र असतं. ख्रिसमस ट्री लावल्यानं वास्तुदोष दूर होतात असंही मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही येते. मात्र लावताना दिशा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वास्तु सल्लागार दिव्या छावडा यांच्याकडून जाणून घेऊया, ख्रिसमस ट्री घरात कोणत्या दिशेला लावावे आणि ख्रिसमस ट्री घरात लावल्यास काय परिणाम होतात.
advertisement
गरजूंना मदत करा : ख्रिसमस हा आनंद वाटण्याचा सण आहे. त्यामुळे गरजू व गरीब मुलांना रात्री भेटवस्तू म्हणून मिठाई, खेळणी, कपडे वाटप करावेत. असे केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करणे हे देवाच्या उपासनेसारखे कार्य आहे, असे प्रभू मानतात. जे लोक असे करतात त्यांना भगवान येशू शुभ फळ देतात.
advertisement
नकारात्मक ऊर्जा निघून जाते : वास्तु तज्ज्ञांच्या मते, ख्रिसमस हा भारतीय वंशाचा सण नसला तरी ख्रिसमसच्या दिवशी घरात ख्रिसमस ट्री लावणे शुभ मानले जाते. घरामध्ये ख्रिसमस ट्री लावल्यानं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय वाईट शक्तींपासूनही मुक्ती मिळू शकते.
या दिशेला लावा ख्रिसमस ट्री : घरात ख्रिसमस ट्री लावण्यापूर्वी दिशा लक्षात ठेवावी. कारण योग्य दिशा तुमच्या जीवनातील संकटे दूर करू शकते. ज्योतिषांच्या मते ख्रिसमस ट्री घराच्या उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते. जर तुम्हाला ख्रिसमस ट्री उत्तर दिशेला ठेवता येत नसेल तर तुम्ही त्याला उत्तर-पश्चिम, ईशान्य किंवा आग्नेय दिशेलाही ठेवू शकता.
advertisement
या दिशेला ख्रिसमस ट्री ठेवू नका : वास्तु सल्लागार दिव्या छावडा यांच्या मते ख्रिसमस ट्री नैऋत्य दिशेला कधी ठेवू नये. कारण, ख्रिसमस ट्री नैऋत्य दिशेला ठेवल्याने खर्चात वाढ होते, जोडीदार आणि कुटुंबाशी संबंध बिघडतात. तसेच पश्चिम दिशेला ठेवल्यानं कामात नफा कमी मिळतो.
advertisement
मुख्य गेटवर लावणे टाळा: ख्रिसमस ट्री घराच्या मुख्य गेटवर, कोणत्याही खांबाजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी लावणे अशुभ मानले जाते. या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. याशिवाय मानसिक तणावही कमी होतो.
लाईटचे रंग : ख्रिसमस ट्री सजवताना लाईटच्या रंगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तूनुसार ख्रिसमस ट्री सजवताना त्यावर लाल आणि पिवळ्या रंगाची रोषणाई असावी. याशिवाय तुमची इच्छा लिहून ती ख्रिसमसच्या ट्रीवर टांगल्याने इच्छित परिणाम मिळतात, असे मानले जाते. तीन नाणी लाल रिबनमध्ये बांधून ख्रिसमसच्या ट्रीवर टांगली जातात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2023 8:17 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Christmas 2023 Vastu: घरात या दिशेला लावा ख्रिसमस ट्री, नाही राहणार वास्तूदोष, येशू होईल प्रसन्न