Bhadrakal: भद्रकाळ का असतो अशुभ? कोण आहे भद्रा? राखी बांधण्यासाठी 'ती' वेळ का टाळावी

Last Updated:

What is Bhadrakal : तिरुपतीचे ज्योतिषी डॉ.कृष्णकुमार भार्गव सांगतात की, कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी भद्रकाळाचा विचार करणे आवश्यक आहे. शुभ कार्य फक्त भद्रकाळापूर्वी किंवा नंतरच्या मुहूर्तामध्येच करावे. कारण...

भद्रकाळ म्हणजे काय? त्यात राखी बांधणं का टाळतात
भद्रकाळ म्हणजे काय? त्यात राखी बांधणं का टाळतात
मुंबई, 25 ऑगस्ट : ज्योतिषशास्त्रात भद्र हा अशुभ काळ म्हणून ओळखला जातो. भद्रकाळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही. भद्र काळात राखी बांधली जात नाही, शिवाय कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. यंदा भद्रकाळ असल्यामुळे 30 आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भद्र काळात केलेलं कोणतंही शुभ कार्य यशस्वी होऊ शकत नाही, त्यात काही ना काही विघ्न येतात. असे का घडते, भद्र म्हणजे कोण? याविषयी जाणून घेऊ.
भद्र कोण आहे?
तिरुपतीचे ज्योतिषी डॉ.कृष्णकुमार भार्गव सांगतात की, कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी भद्रकाळाचा विचार करणे आवश्यक आहे. शुभ कार्य फक्त भद्रकाळापूर्वी किंवा नंतरच्या मुहूर्तामध्येच करावे. भद्र ही ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे अपत्य आहे. भद्र ही शनिदेवाची बहीण आहे. पौराणिक कथेनुसार भद्रा स्वभावाने अतिशय आक्रमक असून नेहमी उलथापालथ घडवून आणणारी मानली जाते.
advertisement
भद्राचे स्वरूप कसे असते?
भद्राचा जन्म राक्षसांना मारण्यासाठी झाला असे म्हणतात. त्याचं व्यक्तिमत्त्व इतरांमध्ये भीती निर्माण करणारं आहे. त्याच्या शरीराचा रंग काळा, मोठे दात आणि लांब केस. ती भितीदायक दिसते. ती जन्मापासूनच उपद्रवी स्वभावाची होती, असे म्हणतात.
advertisement
लहानपणापासून भद्रा शुभ कार्यात अडथळा आणू लागली -
ती लहानपणापासूनच हवन, यज्ञ आणि इतर शुभ कार्यात अडथळा आणू लागली. भद्राची भीती लोकांच्या मनात घर करून बसली. लोक तिच्यावर नाराज होऊ लागले. भद्राच्या कृती आणि स्वभावामुळे तिचे वडील सूर्यदेवही खूप काळजीत होते. ते ब्रह्मदेवांशी भद्राबद्दल बोलले.
ब्रह्म देवानं भद्राची वेळ निश्चित केली -
ब्रह्मदेवांनी भद्राला समजावले आणि सांगितले की, तुझ्यासाठी एक काळ निश्चित आहे, तू त्या काळातच वास्तव्य करशील. तू अधोलोक(पाताळ), स्वर्ग आणि पृथ्वी या ठिकाणी राहशील. तू तुझ्या वेळेत कोणाच्या शुभ कार्यात अडथळे निर्माण करू शकतेस.
advertisement
अशा प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली -
ब्रह्मदेवांच्या सूचनेनंतर पंचांगात भद्राची एक निश्चित वेळ करण्यात आली. जेव्हा पंचांगात विष्टिकरण घडते तेव्हा तो भद्रकाळ असतो. अशा प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली. पृथ्वी लोकातील भद्रकाळ हानीकारक मानला जातो, तर स्वर्गातील आणि पाताळातील भद्रा पृथ्वी लोकांवर दुष्परिणाम करणारी मानली जात नाही.
advertisement
भद्रकाळामध्ये राखी का बांधली जात नाही?
भद्र हा अशुभ मुहूर्त मानल्यामुळे त्या वेळी राखी बांधली जात नाही. भद्र काळात रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली, तेव्हा त्याचं सर्व काही संपलं, अशी प्रचलित धारणा आहे.
रक्षाबंधन 2023 रोजी भद्रकाळ?
या वर्षी 30 ऑगस्टला रक्षाबंधनावर भद्रकाळाची छाया आहे. रक्षाबंधन दिवशी भद्रकाळ सकाळी 10.58 वाजता सुरू होत असून रात्री 09.01 पर्यंत आहे. ही भद्रा पृथ्वी जगताची आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भद्रा पूंच संध्याकाळी 05:30 ते 06:31 पर्यंत आणि भद्रा मुख संध्याकाळी 06:31 ते 08:11 पर्यंत आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Bhadrakal: भद्रकाळ का असतो अशुभ? कोण आहे भद्रा? राखी बांधण्यासाठी 'ती' वेळ का टाळावी
Next Article
advertisement
ZP Election Municipal elections : निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन
निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!
  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

View All
advertisement