Mahashivratri 2025 Upay: घरात महाशिवरात्रीच्या दिवशी कराव्या या गोष्टी; धन-ऐश्वर्य प्राप्ती, आरोग्य ठणठणीत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivratri 2025 Upay: हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची...
मुंबई : हिंदू धर्मात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. भोलेनाथांची पूजा घरोघरी-मंदिरामध्ये केली जाते. मात्र, महादेवाच्या पूजेसाठी महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे व्रत केलं जातं. वर्षभरात येणाऱ्या 12 शिवरात्रींपैकी माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे, कारण त्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते.
शास्त्रानुसार या दिवशी शंकर-पार्वतीचा शुभ विवाह झाल्याचे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत. यामुळे आपल्याला अनेक पटींनी जास्त परिणाम मिळतील.
advertisement
या वर्षी महाशिवरात्रीला अनेक शुभ योग तयार होत आहे. या विशेष योगावर काही उपाय केल्यानं अनेक पटींनी जास्त शुभ फळ मिळते. जाणून घेऊया शिवपुराणानुसार काही खास उपायांची माहिती.
काळी मिरी, काळे तीळ - महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातात 7 काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील.
advertisement
बेरी - महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा. असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते. अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.
बेलपत्राखाली दिवा लावावा - महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल, असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले. त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील. त्यामुळे या दिवशी बेलपत्राखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा. यामुळे सुख-समृद्धी येईल.
advertisement
धतुरा अर्पण करा - महाशिवरात्रीला 07 धतुरे घेऊन एका धतुऱ्याला हातात घेऊन चंद्रमौलींचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा.
भस्म अर्पण करा - महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे महादेव सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात.
advertisement
बेलपत्र - महाशिवरात्रीच्या दिवशी 11, 21 किंवा 101 बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून भक्तीभावाने शिवलिंगाला अर्पण करावी. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 19, 2025 10:25 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2025 Upay: घरात महाशिवरात्रीच्या दिवशी कराव्या या गोष्टी; धन-ऐश्वर्य प्राप्ती, आरोग्य ठणठणीत