Morning Mantra: हा 1 साधा मंत्र जीवनात शांती, सकारात्मकता आणेल; दररोज सकाळी करावा जप

Last Updated:

Morning Mantra: वैदिक मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की नियमितपणे जप केल्यास आपण सर्वात मोठ्या अडचणींपासून किंवा सर्वात मोठ्या त्रासापासून मुक्त होऊ शकतो.

News18
News18
मुंबई : आजकालच्या धावपळीच्या युगात नकारात्मक ऊर्जा आपल्यापैकी अनेकांना त्रास देते. अनेकांना खूप मानसिक ताण-तणाव असतात, आपण अगदी स्वतःवरही चिडायला लागतो. त्याचा परिणाम आपल्या नित्य कामांवर होतो आणि आपण काही नीट करू शकत नाही. या समस्येसाठी ज्योतिष शास्त्रामध्ये एक साधा मंत्र सांगण्यात आला आहे. या मंत्राचा रोज सकाळी जप केल्यानं नकारात्मकता दूर होते. हा कोणता मंत्र आहे? ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ.
मंत्राचा प्रभाव -
हिंदू धर्मग्रंथांमध्ये मंत्रांच्या प्रभावाचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्राचीन काळी कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषी यज्ञ, आहुती आणि मंत्राचा आधार घेत असत. वैदिक मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की नियमितपणे जप केल्यास आपण सर्वात मोठ्या अडचणींपासून किंवा सर्वात मोठ्या त्रासापासून मुक्त होऊ शकतो.
कोणता मंत्र?
मंत्र - ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
advertisement
भगवान श्रीहरी विष्णूचा हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि नकारात्मकता दूर करण्यात प्रभावी ठरू शकतो.
जप कसा करायचा -
दररोज सकाळी लवकर उठणे, प्रात:विधी, आंघोळ इत्यादी करणे, स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देव्हाऱ्या समोर बसून दिवा लावावा आणि मनात भगवान विष्णूचे ध्यान करताना या मंत्राची जपमाळ करावी. 108 वेळा जप करणं उत्तम राहील. फक्त तीन दिवसात तुम्हाला असे दिसून येईल की तुमचे शरीर हलके होऊ लागले आहे आणि तुमच्या सभोवतालची नकारात्मकता आपोआप दूर होत आहे.
advertisement
मंत्रोच्चाराचे फायदे -
-तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावाने त्रस्त असाल तर या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-या मंत्राचा जप केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मकता तर येईलच पण, कुटुंबातही सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल.
- भगवान विष्णूच्या या मंत्रात तुमच्या आजूबाजूला पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास क्षमता आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Morning Mantra: हा 1 साधा मंत्र जीवनात शांती, सकारात्मकता आणेल; दररोज सकाळी करावा जप
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement