Ghota Tradition : नवरीच्या घरापर्यंत वरात, त्या माणसाला दिला जातो 1 रुपया, महाराष्ट्रातल्या समाजातली अनोखी परंपरा

Last Updated:

ही परंपरा लग्नाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच हळद समारंभ झाल्यानंतर पार पडते. गेल्या हजारो वर्षांपासून ही परंपरा बंजारा समाजामध्ये जपली जात असून आजही ती तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.

+
घोटा

घोटा नावाची परंपरा एक सांस्कृतिक जपन 

बीड : भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. प्रत्येक प्रांत, समाज आणि समुदायामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा आणि चालीरीती पाहायला मिळतात. लग्न समारंभ, सण-उत्सव हे या परंपरांचे जिवंत दर्शन घडवतात. अशाच पारंपरिक परंपरांमध्ये बंजारा समाजातील घोटा या विशेष पद्धतीचे महत्त्व वेगळे आहे. ही परंपरा लग्नाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच हळद समारंभ झाल्यानंतर पार पडते. गेल्या हजारो वर्षांपासून ही परंपरा बंजारा समाजामध्ये जपली जात असून आजही ती तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. तर ही परंपरा काय आहे? याबद्दलचं शिकवाडी संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक भारत राठोड यांनी माहिती दिली आहे.
घोटा परंपरेच्या माध्यमातून बंजारा समाज आपल्या सांस्कृतिक वारशाचा जागर करत असतो. लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवर नववधू आणि वराच्या कुटुंबीयांमध्ये एक वेगळीच उत्सवाची रंगत दिसून येते. या परंपरेमध्ये नवरदेव आपल्या घरीपासून नवरीच्या घरी मिरवणूक काढतो. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, बंजारा वेशभूषेत रंगलेली मंडळी, गाणी-नृत्ये यांचा संगम पाहायला मिळतो, असं भारत राठोड सांगतात
advertisement
नवरदेव नवरीच्या घरी निघण्यापूर्वी मानाचा एक रुपया समाजातील नाईकाला अर्पण केला जातो. नाईक ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असते. या एका रुपयामध्ये नवरदेवाच्या कुटुंबाकडून समाजातील वडीलधाऱ्यांप्रती सन्मान व्यक्त केला जातो. हा क्षण केवळ एक रीत म्हणून नव्हे तर सामाजिक सन्मानाचा भाग म्हणून साजरा केला जातो, असं भारत राठोड सांगतात
advertisement
जग वेगाने बदलत असतानाही बंजारा समाजाने आपली परंपरा टिकवून ठेवली आहे. आधुनिकतेच्या लाटेत अनेक जुनी रीतिरिवाज हरवत असताना घोटा पद्धत मात्र समाजाच्या मुळांशी घट्ट जोडलेली आहे. नव्या पिढीला आपल्या परंपरेचा अभिमान वाटावा या उद्देशाने या पद्धतीला महत्त्व दिले जातं.
या परंपरेमुळे बंजारा समाजातील एकोपा, सहकार्य आणि एकात्मता अधिक दृढ होते. त्यामुळे घोटा ही केवळ लग्नाची एक पद्धत न राहता ती समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. समाजातील जेष्ठ मंडळी आणि युवक यांच्यातील दुवा म्हणूनही ही परंपरा आजतागायत जिवंत आहे, असंही भारत राठोड यांनी सांगितलं
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ghota Tradition : नवरीच्या घरापर्यंत वरात, त्या माणसाला दिला जातो 1 रुपया, महाराष्ट्रातल्या समाजातली अनोखी परंपरा
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement