भगवान शिवाची पूजा केल्यावर का वाजवली जाते 3 वेळा टाळी? हिंदूधर्मातील 'या' परंपरेबद्दल तुम्हाला माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर या परंपरेला धार्मिकदृष्ट्या फार मोठं महत्त्व आहे. ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, शिवलिंगासमोर तिन वेळा टाळी वाजवण्यामागे तीन भावनात्मक हेतू असतात.
मुंबई : श्रावण महिना आला की संपूर्ण वातावरण शिवमय होऊन जातं. या काळात अनेक भक्त महादेवाच्या पूजनात, शिवाच्या दर्शनात आणि विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात. हिंदू धर्मात भगवान शंकर हे तपस्वी आणि करुणामयी देव मानले जातात. त्यांच्या पूजनाची पद्धतही अत्यंत शुद्ध आणि विशिष्ट असते. त्यातही एक प्राचीन परंपरा आजही अनेकजण पाळतात. ती म्हणजे शिवपूजनानंतर शिवलिंगासमोर तीन वेळा टाळी वाजवणं.
तुम्हाला या परंपरेबद्दल माहितीय का? आणि माहित असेल तरी यामागचं कारण तुम्हाला माहितीय का?
खरंतर या परंपरेला धार्मिकदृष्ट्या फार मोठं महत्त्व आहे. ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, शिवलिंगासमोर तिन वेळा टाळी वाजवण्यामागे तीन भावनात्मक हेतू असतात.
पहिली टाळी ही आपण इथे हजर आहोत, हे भगवान शंकरांना कळवण्यासाठी असते. ही भक्ताची आत्मिक उपस्थिती दर्शवते.
advertisement
दुसरी टाळी ही यात आपल्या घरात धन-धान्याची भरभराट राहो, अशी प्रार्थना करण्यासाठी केली जाते.
तिसरी टाळी ही क्षमायाचनेसाठी असते. भक्त आपल्यातील चुकांसाठी क्षमा मागतो आणि प्रभूच्या चरणांमध्ये स्थान देण्याची विनंती करतो.
रावण आणि श्रीराम दोघांनीही केली होती टाळी वाजवण्याची कृती
धार्मिक मान्यतानुसार, लंकेचा राजा रावण आणि प्रभू श्रीराम यांनी सुद्धा शिवपूजन केल्यानंतर तीन वेळा टाळी वाजवली होती. असं मानलं जातं की रावणाने शिवाची कठोर तपश्चर्या करून टाळी वाजवली आणि त्याला शिवाच्या कृपेने लंकेचं राज्य मिळालं.
advertisement
तसेच, प्रभू रामचंद्र जेव्हा लंका गाठण्यासाठी समुद्रावर रामसेतु बांधत होते, तेव्हाही त्यांनी शिवलिंगाची पूजा करून तीन वेळा टाळी वाजवली आणि त्यांचं कार्य सफल झालं.
आता प्रश्न असा की ही टाळी कशी वाजवायची? दिवसा कधीही तिनवेळा टाळी वाजवली तर चालते का?
शिव हे ध्यानस्थ देवता मानले जातात. म्हणून प्रत्येक वेळी किंवा कोणत्याही वेळी टाळी वाजवणं योग्य नाही. फक्त संध्यावंदनाच्या वेळी किंवा विशेष पूजा प्रसंगीच टाळी वाजवावी किंवा घंटा वाजवावी, असं धार्मिक शास्त्र सांगतं.
advertisement
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
भगवान शिवाची पूजा केल्यावर का वाजवली जाते 3 वेळा टाळी? हिंदूधर्मातील 'या' परंपरेबद्दल तुम्हाला माहितीय का?