गाडीच्या टायरखाली लिंबू का ठेवतात? फक्त धार्मिक नाही, तर यामागे आहे वैज्ञानिक कारण

Last Updated:

गाडीच्या टायरखाली एक लिंबू ठेवतो, हे दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, पण कधी असा विचार केला आहे का की असा लिंबू का ठेवला जातो?

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : भारतीय समाजात गाडी किंवा कोणतीही नवीन वस्तू घेतल्यावर सर्वप्रथम तिची पूजा केली जाते. ही फक्त एक परंपरा नाही, तर नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करण्याचा एक उपाय मानला जातो. विशेषतः नवीन कार किंवा दुचाकी खरेदी केल्यानंतर आपण पहिल्यांदा मंदिरात जातो, गाडीवर फुले वाहतो, नारळ फोडतो आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीच्या टायरखाली एक लिंबू ठेवतो. हे दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, पण कधी असा विचार केला आहे का की असा लिंबू का ठेवला जातो?
ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
ज्योतिषशास्त्रानुसार लिंबूचा संबंध शुक्र आणि चंद्र ग्रहांशी आहे. लिंबू पिकवण्याची प्रक्रिया शुक्राशी जोडली जाते, तर त्यातील रस चंद्राशी संबंधित मानला जातो. त्यामुळे लिंबू या दोन्ही ग्रहांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं. लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जेला थांबवण्याची क्षमता असते, असंही मानलं जातं.
नवीन वस्तूंवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव?
ज्योतिषानुसार नवीन वस्तू, विशेषतः वाहनं, यांच्याभोवती नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे गाडीचा पहिला प्रवास सुरक्षित आणि सकारात्मक व्हावा यासाठी टायरखाली लिंबू ठेवण्याची प्रथा सुरू झाली. यामुळे गाडीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि "वाईट नजर" लागत नाही, असा विश्वास आहे.
advertisement
लिंबू फोडल्यानंतर काय होतं?
जेव्हा टायर लिंबावरून जातो तेव्हा लिंबाचा रस हवेत पसरतो. असे मानले जाते की हा रस हवेत पवित्रता निर्माण करतो आणि मानसिक शांतता देतो. बऱ्याच घरांमध्ये आजही मुख्य दरवाज्यावर मिरची आणि लिंबू लटकवण्याची प्रथा पाहायला मिळते, जी नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठीच आहे.
फक्त धार्मिक नाही, वैज्ञानिक कारणसुद्धा
हे सगळं ऐकून वाटतं की ही फक्त एक अंधश्रद्धा आहे. पण काही लोक असंही मानतात की लिंबू फोडल्यावर निघणाऱ्या रसामधील वायू वातावरणातील काही हानिकारक घटकांवर परिणाम करतो. यामुळे मन प्रसन्न राहतं आणि सुरुवात चांगली होते.
advertisement
टायरखाली लिंबू ठेवण्याची परंपरा ही केवळ धार्मिक भावना नाही, तर त्यामागे अनेक ज्योतिषीय, मानसिक आणि थोडीफार वैज्ञानिक कारणंही आहेत. नवीन प्रवासाची सुरुवात सकारात्मक व्हावी, हेच यामागचं मुख्य कारण मानलं जातं.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
गाडीच्या टायरखाली लिंबू का ठेवतात? फक्त धार्मिक नाही, तर यामागे आहे वैज्ञानिक कारण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement