Navratri Puja: नवरात्रीमध्ये देवीची पूजा 9 दिवस का करतात? अंकशास्त्रानुसार नऊ क्रमांकाचं महत्त्व असं आहे

Last Updated:

Navratri Puja: दुर्गादेवीची पूज नऊ दिवस का करतात, अंकशास्त्रात नऊ क्रमांकाचं महत्त्व काय ते या निमित्ताने पंडित रमेश भोजराज द्विवेदी यांच्याकडून जाणून घेऊ या. 

News18
News18
मुंबई : सनातन धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नवरात्रीला थोडेच दिवस राहिले आहेत. त्यामुळे सगळीकडे या सणाचा उत्साह दिसत आहे. दुर्गादेवीच्या आगमानासाठी सगळीकडे तयारी चालू आहे. नऊ दिवस दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा केली जाईल. देशभरात हे नऊ दिवस भक्तिमय वातावरण असेल. या नऊ दिवसांच्या उत्सवाचा समारोप दसऱ्याला होतो. दुर्गादेवीची पूज नऊ दिवस का करतात, अंकशास्त्रात नऊ क्रमांकाचं महत्त्व काय ते या निमित्ताने पंडित रमेश भोजराज द्विवेदी यांच्याकडून जाणून घेऊ या.
दुर्गादेवीची पूजा नऊ दिवस का करतात?
संस्कृतमध्ये नवरात्रीचा अर्थ 'नऊ रात्री' असा होतो, 'नव' म्हणजे नऊ आणि 'रात्री' म्हणजे रात्री. पूजेचे नऊ दिवस दुर्गादेवीची नऊ रूपं वेगवेगळ्या गोष्टींची प्रतिनिधित्व करतात. ती स्त्री शक्ती आणि दैवी ऊर्जेचं प्रतीक असतात. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीतल्या या नऊ रात्री खूप खास असतात, असं म्हटलं जातं.
advertisement
नवरात्रीत दुर्गादेवीच्या नऊ रुपांची होते पूजा
पहिला दिवस माता शैलपुत्रीचा - पर्वतकन्या माता शैलपुत्री निसर्ग आणि विकासाचं प्रतिनिधित्व करते.
दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीचा - या देवीने खूप तपश्चर्या केली. ती भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे.
advertisement
तिसरा दिवस माता चंद्रघंटा देवीचा - ही शांती आणि स्थिरतेची देवी मानली जाते आणि ती शक्तीचं प्रतिनिधित्व करतं.
चौथा दिवस माता कूष्मांडाचा - या देवीने ब्रह्मांड निर्माण केलं. ती सर्जनशीलतेचं प्रतीक आहे.
पाचवा दिवस स्कंदमातेचा - मातृत्वाचं प्रतिनिधित्व करणारी स्कंदमाता ही भगवान कार्तिकेयाची आई आहे.
सहावा दिवस कात्यायनी मातेचा - महिषासुराचा पराभव करणारी ही देवी शौर्याचं प्रतीक आहे.
advertisement
सातवा दिवस कालरात्रीचा - ही मृत्यू आणि वाईट शक्तींचा नाश करणारी देवी आहे, असं मानलं जातं.
आठवा दिवस महागौरीचा - ही पवित्रता आणि ज्ञानाची देवी असून, ती आंतरिक शांतीचं प्रतिनिधित्व करते.
नववा दिवस सिद्धिदात्रीचा - अलौकिक शक्ती प्रदान करणारी माता सिद्धिदात्री ही आत्मज्ञानाचं प्रतीक आहे.
advertisement
अंकशास्त्रात 9 या अंकाचं महत्त्व -
अंकशास्त्रानुसार प्रत्येक संख्येची स्वतःची वेगळी ऊर्जा आणि महत्त्व असतं. नऊ नंबर आध्यात्मिक जागृती, निःस्वार्थता आणि प्रेमाशी संबंधित मानला जातो. ही एक आध्यात्मिक संख्या आहे. ती परिपूर्णता, ज्ञान आणि माणुसकी दर्शवते.
नऊ हा एकल अंकांपैकी शेवटचा अंक आहे. तो चक्राच्या समाप्तीचा प्रतीक आहे. ही पूर्ण संख्या मानली जाते. कारण तिथे सगळ्या गोष्टी एका चक्रात येतात.
advertisement
ज्याप्रमाणे नववा महिना मुलाच्या जन्माचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात नऊ हा आकडा विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचं प्रतीक मानला जातो.
नवरात्रीत भक्त नऊ दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासाला निघतात. त्यातून शेवटी आंतरिक समाधान आणि नावीन्याची भावना येते. त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस खूप खास मानले जातात.
नऊ अंक ऊर्जा आणि अध्यात्माचं प्रतीक
अंकशास्त्रात नऊ हा अंक प्रेम, ज्ञान, सहानुभूती आणि भावनांशी संबंधित आहे. हा आध्यात्मिक रूपाने विकसित अंक आहे, असं म्हणतात. तो मानवकल्याणाबरोबरच संबंधांचं प्रतीक आहे.
advertisement
नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा करणं या ऊर्जेशी अनुरूप आहे. कारण नवरात्रीचा सण लोकांना आध्यात्मिक विकास, आत्म-चिंतन आणि वैयक्तिक, तसंच वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो. नवरात्र हा आंतरिक शुद्धी आणि ऊर्जेच्या दैवी स्रोताशी जोडण्याचा सण आहे, असं म्हणतात.
रचनात्मक ऊर्जा आणि परिवर्तनाशी संबंधित आहे नऊ अंक
नऊ अंकामध्ये परिवर्तनाची ऊर्जा, रचनात्मकता आणि बदलाला प्रेरणा देण्याची क्षमता असते. अंकशास्त्रात ही संख्या मर्यादेतून मुक्त होण्याची आणि पुढे जाण्याची संख्या आहे, असं मानलं जातं.
आपल्या विविध रूपांमध्ये दुर्गादेवी या परिवर्तनकारी शक्तीचं प्रतीक आहे. नऊ दिवस तिची पूजा करून भक्त त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. अडथळ्यांवर मात करणं, रचनात्मकतेला चालना देणं किंवा नवीन आध्यात्मिक प्रवास करणं अथवा स्वतःची वाढ सुलभ करण्यात नऊ हा अंक महत्त्वाची भूमिका बजावतो.
हिंदू धर्मात नऊ अंकाचं महत्त्व -
नऊ या अंकाचं महत्त्व फक्त अंकशास्त्र किंवा नवरात्रीपुरतं मर्यादित नाही.
नवग्रह - नऊ ग्रह मानवी जीवनातले पैलू नियंत्रित करतात. नवरात्रीत नऊ दिवस दुर्गादेवीची उपासना केल्याने या ग्रहांची शक्ती शांत होते आणि जीवनात संतुलन राहतं, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.
नवरत्न - नऊ रत्नं धारण करण्याची प्राचीन परंपरा सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मक प्रभाव दूर करते असं मानलं जातं.
नवरस - भारतीय शास्त्रीय नृत्य आणि कलेत नऊ रस आहेत. हे रस दुर्गादेवीच्या विविध रूपांशी संबंधित असतात. ते देवीची दैवी शक्ती दर्शवतात.
भक्तीची नऊ रूपं - हिंदू धर्मात भक्तीचे नऊ प्रकार आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri Puja: नवरात्रीमध्ये देवीची पूजा 9 दिवस का करतात? अंकशास्त्रानुसार नऊ क्रमांकाचं महत्त्व असं आहे
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement