IND vs SA T20 : अभिषेकने घेतला नवा आयफोन, एअरपोर्टवरच शुभमनसोबत लागली पैज, जिगरी दोस्तांचा Video व्हायरल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abhishek Shubhman Airport Video Viral : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात कटक येथे पहिला टी-ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. अशातच अभिषेक अन् शुभमन एअरपोर्टवर पोहोचले आहेत.
Abhishek Sharma Shubhman Gill Video : वर्ल्ड कर विनर युवराज सिंगचे दोन चेले आता टीम इंडियाची शान आहेत. अशातच अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये दोन्ही स्टार खेळाडू एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी अभिषेक शर्माने त्याचा आयफोन सर्वांना दाखवला तर शुभमन गिल फोनवर बोलत चालल्याचं दिसलं. अशातच टीमची बस एअरपोर्टबाहेर लागली होती. दोन्ही खेळाडू टीमच्या बसमध्ये बसल्यानंतर दोघांची मस्ती सुरू झाली.
अभिषेकचा नवा आयफोन
शुभमन गिलने अभिषेकचा फोन पाहिला अन् दोन्ही फोनमधील कॅमेऱ्यातील फरक चेक केला. कुणाचा फोन चांगला यावरून दोघांत पैज लागली होती. त्यावेळी दोन्ही खेळाडू उत्साहात असल्याचं दिसून आलं. अभिषेकचा नवा आयफोन शुभमन गिलला देखील आवडल्याचं दिसून आलं. अभिषेकने Apple iPhone 17 Pro Max घेतला की काय? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
पाहा Video
— Shubman X 77 (@AyushKumar76463) December 8, 2025
थ्रोबॅक फोटो शेअर
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल आणि युवा बॅट्समन अभिषेक शर्मा यांच्यातील मैत्री क्रिकेट जगतात नेहमीच चर्चेचा विषय असते. हे दोघेही पंजाबकडून खेळतात आणि त्यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. नुकताच, अभिषेक शर्माने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिषेक शर्माने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गिलसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.
advertisement
युवराजचे चेले देशाची शान
अभिषेक शर्माचा हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे किंवा त्यांनी एकत्र खेळायला सुरुवात केली तेव्हाचा असावा. या फोटोमध्ये ते दोघेही एकत्र हसताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अभिषेकने शुभमनला टॅग केले आहे. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा दोघेही पंजाब क्रिकेट टीममधून एकत्र खेळले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA T20 : अभिषेकने घेतला नवा आयफोन, एअरपोर्टवरच शुभमनसोबत लागली पैज, जिगरी दोस्तांचा Video व्हायरल


