Vaibhav Suryavanshi ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडणार, स्पर्धेच वेळापत्रक जाहीर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलियानंतर आता वैभव सुर्यवंशी अफगाणिस्तानची धुलाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका कधी खेळवली जाणार आहे? स्पर्धेचे वेळापत्रक नेमके काय आहे ? हे जाणून घेऊयात.
Vaibhav Suryavanshi News :टीम इंडियाचा 14 वर्षीय स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याची ऑस्ट्रेलिया विरूद्ध चांगलीच बॅट तळपली होती. या मालिकेनंतर आता अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.त्यामुळे आता ऑस्ट्रेलियानंतर आता वैभव सुर्यवंशी अफगाणिस्तानची धुलाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका कधी खेळवली जाणार आहे? स्पर्धेचे वेळापत्रक नेमके काय आहे ? हे जाणून घेऊयात.
खरं तर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेच या स्पर्धेची माहिती दिली होती. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या युवा भारत संघांविरुद्धच्या युवा एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेण्यासाठी अफगाणिस्तानचा 19 वर्षांखालील संघ भारतात येणार आहे.या मालिकेत भारत 19 वर्षांखालील अ आणि भारत 19 वर्षांखालील ब संघ सहभागी होतील आणि 13 दिवसांच्या कालावधीत ही मालिका बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.
advertisement
या मालिकेनंतर अफगाणिस्तानचा 19 वर्षांखालील संघ बांगलादेश दौरा करेल, जिथे ते पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेश संघाचा सामना करतील.ही मालिका दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची तयारी म्हणून ओळखली जाते. कारण यामुळे झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या एसीसी पुरुषांच्या 19 वर्षांखालील आशिया कप आणि आयसीसी 19 वर्षांखालील पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक 2026 च्या आधी खेळाडूंना खेळण्यासाठी वेळ मिळेल.
advertisement
"आयसीसी पुरुषांचा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जवळ येत आहे आणि आम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून खोस्त आणि नांगरहार प्रांतांमध्ये कठोर प्रशिक्षण आणि तयारी शिबिरांच्या विविध टप्प्यांद्वारे या स्पर्धेसाठी आमच्या संघाची तयारी करत आहोत. या तयारी शिबिरांना बांगलादेशमधील पाच सामन्यांची मालिका आणि भारतात होणाऱ्या या आगामी तिरंगी मालिकेसह आंतरराष्ट्रीय दौरे पूरक आहेत,अशी माहिती एसीबीचे सीईओ नसीब खान यांनी दिली."मला आशा आहे की या तयारींसह, दर्जेदार आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे, आमच्या भविष्यातील स्टार्सना आशिया कप आणि झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषक या दोन प्रमुख स्पर्धांपूर्वी उत्कृष्ट स्पर्धात्मक अनुभव मिळेल."
advertisement
17 नोव्हेंबर रोजी तिरंगी मालिका सुरू होणार आहे.या मालिकेतला अंतिम सामना 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे.17 नोव्हेंबर रोजी भारताच्या 19 वर्षांखालील अ संघाचा भारतीय 19 वर्षांखालील ब संघाशी सामना होऊन तिरंगी मालिका सुरू होईल. 19 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानच्या 19 वर्षांखालील भारताच्या 19 वर्षांखालील ब संघाविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात होईल.या संघात वैभव सुर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासह इतर खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
advertisement
ही मालिका डबल राउंड-रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल ज्यामध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी दोनदा सामना करेल. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी शीर्ष दोन संघ पात्र ठरतील.
मालिकेचे वेळापत्रक:
17 नोव्हेंबर – भारत अंडर-19'अ' विरुद्ध भारत अंडर-19 'ब', सीओई, बंगळुरू
19 नोव्हेंबर – भारत अंडर-19 'ब' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-19, सीओई, बंगळुरू
21 नोव्हेंबर – भारत अंडर-19 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-19, सीओई, बंगळुरू
advertisement
23 नोव्हेंबर – भारत अंडर-19'अ' विरुद्ध भारत अंडर-19 'ब', सीओई, बंगळुरू
25 नोव्हेंबर – भारत अंडर-19 'ब' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-19, सीओई, बंगळुरू
27 नोव्हेंबर – भारत अंडर-19 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-19, सीओई, बंगळुरू
30 नोव्हेंबर – अंतिम सामना, सीओई, बंगळुरू.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडणार, स्पर्धेच वेळापत्रक जाहीर