समंथा-राज निदिमोरूचं जमलं! नव्या घरात होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह दिवाळी साजरी, फोटोंनी घातला धुमाकूळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Samantha Ruth Prabhu Diwali Celebrations : समंथाने सोशल मीडियावर दिवाळीचे काही खास फोटो शेअर केले आहेत, यामुळे ती एका विवाहित दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या जुन्या चर्चांना आता पुन्हा एकदा जोरदार उधाण आले आहे.
मुंबई : साऊथची ग्लॅमरस अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या दिवाळी सेलिब्रेशनमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. समंथाने सोशल मीडियावर दिवाळीचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि याच फोटोंमुळे ती एका विवाहित दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या जुन्या चर्चांना आता पुन्हा एकदा जोरदार उधाण आले आहे. या फोटोंनी तिने आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे की काय, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे!
राज निदिमोरूच्या कुटुंबासोबत दिवाळी!
नुकतंच समंथाने नवं घर घेतलं असून याच घरात तिने पहिली दिवाळी साजरी केली. यावेळी चित्रपट निर्माता राज निदिमोरूनेही तिच्यासोबत दिवाळी साजरी केली. राज हा समंथाच्या हिट वेब सिरीज 'द फॅमिली मॅन: सीझन २' चा सह-निर्माता आहे. दोघांनीही एकत्र दिवाळी साजरी केल्याचे फोटो समंथाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
advertisement
या फोटोंमध्ये समंथा हिरव्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये आहे, तर राज निळ्या रंगाचा कुर्ता घालून हसताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये राजचे कुटुंबीय देखील दिसत आहेत. "Filled with gratitude" असे कॅप्शन देत समंथाने हे फोटो शेअर केले आहेत. राज विवाहित असल्याने, त्याच्या कुटुंबासोबतचे हे फोटो अनेक नवीन चर्चांना खतपाणी देत आहेत.
advertisement
advertisement
गेल्या अनेक महिन्यांपासून समंथा आणि राज यांच्या डेटिंगची चर्चा सुरू आहे. मुंबईतील एका जिममधून बाहेर पडताना आणि एकाच कारमध्ये बसताना ते दोघे काही आठवड्यांपूर्वी एकत्र दिसले होते. मात्र, दोघांनीही अजून या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
नागा चैतन्य-शोभिताची पहिली दिवाळी
एकीकडे समंथा राज निदिमोरूमुळे चर्चेत असताना, दुसरीकडे तिचा एक्स-पती अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांच्याही दिवाळी सेलिब्रेशनची जोरदार चर्चा आहे.
advertisement
नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या अफेअरच्या चर्चा खूप आधीपासून सुरू असल्या तरी, त्यांनी कधीच त्या मान्य केल्या नाहीत. आता या दोघांनी एकत्र त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी खूप उत्साहात आणि खास पद्धतीने साजरी केली. तथापि, समंथा आणि राज यांच्यातील नात्याबद्दलही अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण दोघांचेही दिवाळी सेलिब्रेशनच्या खासगी फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
समंथा-राज निदिमोरूचं जमलं! नव्या घरात होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह दिवाळी साजरी, फोटोंनी घातला धुमाकूळ