सचिनने खूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण साराच्या 'त्या' व्हिडिओने बिंग फुटलं,तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिसली सानिया चांडोक
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सचिनने कितीही लपवून ठेवलं तरी ते उघड झालंच आहे. सारा तेंडुलकरच्या एका व्हिडिओने मोठं बिंग फुटलं आहे.या व्हिडिओत अर्जुनची बायको तेंडुलकर घराण्यासोबत दिसली आहे.
Arjun Tendulkar Saaniya Chandok : गेल्या तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच 13 ऑगस्टला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा साखरपूडा पार पडला होता.अर्जूनने सानिया चांडोकसोबत साखरपूडा केला होता. या साखरपूड्यानंतरही सचिन तेंडुलकरने सानिया चांडोक ही त्याची
होणारी सून असल्याचे जाहीर करणे टाळले. पण सचिनने कितीही लपवून ठेवलं तरी ते उघड झालंच आहे. सारा तेंडुलकरच्या एका व्हिडिओने मोठं बिंग फुटलं आहे.या व्हिडिओत अर्जुनची बायको तेंडुलकर घराण्यासोबत दिसली आहे. त्यामुळे या व्हिडिओने सानिया चांडोक तेंडुलकर घराण्याची सून होणार असल्याच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
अर्जूनच्या साखरपूड्याबाबत तेंडुलकर कुटुंबियांनी कमालिची गुप्तता पाळली होती. साखरपुड्याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. आणि 13 ऑगस्टला अचानक माध्यमांना अर्जून तेंडुलकरच्या साखरपूड्याची माहिती मिळाली होती. पण यानंतर देखील तेंडुलकर घराण्याने सानिया चांडोक सून होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता.पण आता साराच्या एका व्हिडिओने बिंग फुटलं आहे.
advertisement
advertisement
खरं तर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने तिच्या करीअरमध्ये एक नवीन सूरूवात केली आहे. साराने अंधेरीमध्ये पिलेटस अकॅडमी उघडली आहे. या अकॅडमीमध्ये व्यायाम केला जातो.याच अकॅडमीचं उद्घाटन काही दिवसांपूर्वी पार पडलं होतं. या उद्घाटनाचे काही खास फोटो आणि व्हिडिओ साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमुळे मोठं गुपित समोर आलं आहे.
advertisement
साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे तेंडुलकर कुटुंबिय गपणती बाप्पााला नमस्कार करताना दिसत आहे.त्यानंतर सचिन तेंडुलकर नारळ फोडून त्या अकॅडमीचं उद्धघाटन करताना दिसला आहे. यासोबत सारा तेंडुलकर त्या अकॅडमीची कागदपत्रे आणि चावी घेताना ही दिसली आहे. तसेच साराने तिच्या मैत्रिणीसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे.
दरम्यान साराने शेअर केलेल्या या एका व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर नारळ फोडत असताना त्याच्या मागे अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर उभी असल्याचे दिसत आहे. या दोघींसोबत सानिया चांडोक देखील या व्हिडिओमध्ये आहे.त्यामुळे तेंडुलकर घराण्याच्या कार्यक्रमात त्यांची सून सानिया चांडोक देखील उपस्थित होती. त्यामुळे या व्हिडिओनेच सानिया चांडोक तेंडुलकर घराण्याची सून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिनने खूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण साराच्या 'त्या' व्हिडिओने बिंग फुटलं,तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिसली सानिया चांडोक