IPL 2026 : कुणीच इंटरेस्ट दाखवला नाही,म्हणून IPLमध्ये रजिस्टर केलं नाही, ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूचा धमाका,जगभरात चर्चा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लिलावानंतर आता एका खेळाडूने मोठा धमाका केला आहे. या स्टार खेळाडूने दुसऱ्याच दिवशी शतक ठोकलं आहे. दरम्यान या शतकानंतर चाहत्यांची उत्सुकता होती की हा खेळाडू नेमका कोणत्या आयपीएल टीममध्ये आहे? पण चाहत्यांची निराशा होणार आहे.
IPL 2026 News : अबुधाबीमध्ये काल मंगळवारी आयपीएल 2026च ऑक्शन पार पडलं आहे.या ऑक्शनमध्ये अनेक नवखे खेळाडू मालामाल झाले तर काही स्टार खेळाडूंना हवी तशी बोली लागली नाही. या लिलावानंतर आता एका खेळाडूने मोठा धमाका केला आहे. या स्टार खेळाडूने दुसऱ्याच दिवशी शतक ठोकलं आहे. दरम्यान या शतकानंतर चाहत्यांची उत्सुकता होती की हा खेळाडू नेमका कोणत्या आयपीएल टीममध्ये आहे? पण चाहत्यांची निराशा होणार आहे.कारण हा खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर पहिल्यांदा हा खेळाडू कोण आहे व त्याने काय कामगिरी केली आहे? हे जाणून घेऊयात. हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर अॅलेक्स कॅरी आहे. अॅलेक्स कॅरी सध्या अॅशेस मालिका खेळतो आहे. या मालिकेतील तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी अॅलेक्स कॅरीने शतक ठोकलं होतं.अॅलेक्स कॅरीने 143 बॉलमध्ये 106 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 8 चौकार लगावले आहेत.
advertisement
दरम्यान अॅशेस मालिकेतील ही कामगिरी पाहून अनेकांना उत्सुकता होती की अॅलेक्स कॅरी नेमक्या कोणत्या आयपीएल संघात आहे तर, अॅलेक्स कॅरी हा यंदाचा आयपीएल हंगाम खेळणार नाही आहे. खरं तर अॅलेक्स कॅरीने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघातून डेब्यू केला होता. त्यानंतर पुढची कोविड काळ अशा सगळ्या घडामोडीत तो 4 वर्ष आयपीएल खेळला नाही. त्यानंतर आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये तो सहभागी झाला होता, पण अनसोल्ड राहिला. त्यानंतर यंदाच्या हंगामात त्याने नोंदणीच केली नाही. त्यामुळे ऑक्शनमध्ये त्याचं नावचं नव्हत. पण आता अॅलेक्स कॅरीची ही खेळी पाहून तो आपल्या फेंचायजीमध्ये असायला हवा होता,असे सर्वांना वाटते आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : कुणीच इंटरेस्ट दाखवला नाही,म्हणून IPLमध्ये रजिस्टर केलं नाही, ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूचा धमाका,जगभरात चर्चा









