Asia Cup : कॅप्टन सूर्याची टीम, पण रोहितने निवडली Playing XI, वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच बाहेर काढलं ट्रम्प कार्ड!

Last Updated:

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया त्यांचा पहिला सामना युएईविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

कॅप्टन सूर्याची टीम, पण रोहितने निवडली Playing XI, वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच बाहेर काढलं ट्रम्प कार्ड!
कॅप्टन सूर्याची टीम, पण रोहितने निवडली Playing XI, वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच बाहेर काढलं ट्रम्प कार्ड!
दुबई : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया त्यांचा पहिला सामना युएईविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, पण पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवने निवडलेल्या टीमबद्दल अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात टीम इंडिया फक्त एक फास्ट बॉलरसह मैदानात उतरत आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या अर्शदीप सिंगला या सामन्यात संधी मिळालेली नाही. जसप्रीत बुमराह याच्याकडे भारताच्या फास्ट बॉलिंगची धुरा असेल. जसप्रीत बुमराहसोबत ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फास्ट बॉलिंगमध्ये टीमला मदत करतील. जसप्रीत बुमराह हा 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलनंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत आहे.

तीन स्पिनरना संधी

advertisement
युएईविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाकडे 3 स्पिनर आहेत. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती, चायनामन कुलदीप यादव आणि डावखुरा स्पिनर अक्षर पटेल यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. दुबईमधील खेळपट्टी संथ आणि स्पिन बॉलिंगला मदत करणारी असल्यामुळे भारताने 3 स्पिनर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी फेब्रुवारी-मार्च महिन्यात युएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती, तेव्हाही रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने फास्ट बॉलिंगपेक्षा स्पिनरवरच जास्त विश्वास दाखवला होता, याचा फायदा टीम इंडियाला झाला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला.
advertisement

भारताची प्लेयिंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : कॅप्टन सूर्याची टीम, पण रोहितने निवडली Playing XI, वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच बाहेर काढलं ट्रम्प कार्ड!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement