IND vs PAK : थर्ड अंपायरने लाईफ लाईन दिली, तरी पाकिस्तानी कॅप्टनने माती खाल्ली, बापूने केला गेम ओव्हर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. 64 रनवरच पाकिस्तानने त्यांच्या 6 विकेट गमावल्या.
दुबई : आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. 64 रनवरच पाकिस्तानने त्यांच्या 6 विकेट गमावल्या. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांना त्यांच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाल्या. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला अक्षर पटेलने जाळ्यात अडकवलं. सलमान आगाला थर्ड अंपायरने लाईफ लाईन दिली, पण तरीही त्याला याचा फायदा उचलता आला नाही.
मॅचच्या 9व्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर सलमान आघाला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं, तेव्हा तो 3 बॉलमध्ये शून्य रनवर खेळत होता. अंपायरने आऊट दिल्यानंतर सलमानने डीआरएस घेतला, यानंतर रिप्लेमध्ये तो आऊट नसल्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे सलमानला जीवनदान मिळालं. थर्ड अंपायरने जीवनदान देऊनही याचा फायदा सलमानला उचलता आला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर अक्षर पटेलने सलमान आगाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मोठा शॉट खेळण्याच्या नादात सलमान आघाने अभिषेक शर्माकडे कॅच दिला.
advertisement
या सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलवर पाकिस्तानने विकेट गमावले. मॅचचा पहिला बॉल वाईड टाकल्यानंतर हार्दिक पांड्याने पुढच्याच बॉलवर सॅम अयुबची विकेट घेतली. ओमानविरुद्धच्या सामन्यातही सॅम अयुब पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता.
हार्दिक पांड्यानंतर जसप्रीत बुमराहनेही त्याच्या पहिल्याच ओव्हरला विकेट घेतली. बुमराहच्या बॉलिंगवर मोहम्मद हॅरिसने हार्दिक पांड्याकडे कॅच दिला. तर अक्षर पटेलनेही त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये फखर झमानला आऊट केलं. फखर झमान 15 बॉलमध्ये 17 रन करून आऊट झाला.
advertisement
भारतीय टीम
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : थर्ड अंपायरने लाईफ लाईन दिली, तरी पाकिस्तानी कॅप्टनने माती खाल्ली, बापूने केला गेम ओव्हर!